हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड लाडका कॉमिक शो आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रकाश झोतात आले आणि प्रेक्षकांच्या मनात वसले. त्यांपैकी एक म्हणजे कोळीवाड्याची रेखा.. अर्थात अभिनेत्री वनिता खरात. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेचा आकडा नुसता वाढतच चालला आहे. तिने साकारलेलं प्रत्येक पात्र हिट ठरतं. वनिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि आता लग्नानंतर ती नवऱ्यासोबत रील बनवताना दिसते आहे. त्यांची एक कॉमेडी रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वनिताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पती सुमितसोबतचा एक कॉमेडीय व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वनिता नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘मांझी द माउंटन मॅन’ या चित्रपटातील ‘ओह फगुनिया….’ हा प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसते आहे. ती हा डायलॉग सुमितकडे बघून बोलत असताना त्याला जवळ ओढते आणि किस करताना दिसते. यावेळी सुमितच्या गालावर चढलेली लाली लगेच लक्ष वेधून घेते. वनिताने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
या व्हिडिओवर MHJ च्या कलाकारांनी, तसेच चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘येडी ग येडी वनी..’. तर आणखी एकाने म्हटले, ‘अरे .. त्या किसनंतर आलेलं ब्लश.. ओह..’. तर आणखी एकाने म्हटले, ‘अगं डायलॉग जरा उलटा नाही का झाला..? तो त्याने म्हणायला हवा होता ग तू नाही..’.
तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर स्माईली शेअर केले आहेत. वनिताने फेब्रुवारी महिन्यात तिचा मित्र सुमित लोंढेशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल झाले होते.
Discussion about this post