हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा आगामी सिनेमा ‘डबल एक्सएल’ लवकरच रिलीज होणार आहे. यामध्ये त्या दोघी एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमाची कहाणी बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर भाष्य करते. शरीरानं जाड असणाऱ्या महिलांसाठी हा चित्रपट एक सकारात्मक विचार देणारा आहे. या सिनेमाचे प्रमोशन करताना मुंबईत हुमा कुरेशीने नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी माध्यमांशी बातचित करताना तिने स्ट्रगल, सुंदर दिसण्याचे मापदंड आणि अशा इतर बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी हुमा कुरेशी म्हणाली कि, ‘आपल्याकडे सुंदर दिसण्याचे मापदंड बनवले आहेत. खरंतर हे समजून घ्यायची गरज आहे की स्त्री म्हणजे बाजारातील कुठली वस्तू नाही. त्यांना स्वतःचे विचार आहेत, त्यांचा स्वतःचा असा एक प्रवास असू शकतो, एक गोष्ट असू शकते, त्यांचं स्वतःचं असं अस्तित्व आहे. पण तरीदेखील स्त्रियांना एक वस्तू म्हणून वागवलं जातं. एका ठराविक वयापर्यंत तुम्ही कामाच्या आहात, त्यानंतर मात्र तुमचा काहीच उपयोग नाही. हा खूप चुकीचा विचार आहे. एक बाई बाजारातली वस्तू नाही, तिची एक्सपायरी डेट नसते.’
‘कोणा मुलीनं हॉट कपडे परिधान केले म्हणून तुम्ही तिला वासनेच्या नजेरनं पाहता. एकीकडे तुम्ही अशी गाणी पाहता ज्यात एक स्त्री एखाद्या गाण्यावर नाचते जेव्हा ती सेक्शुअॅलिटी सेलिब्रेट करते तर दुसरीकडे अशी गाणी पाहता ज्यात एखाद्या पुरुषासमोर ती नाचते, यात खूप अंतर आहे. मी आशा करते लोकांनी सिनेमागृहात येऊन डबल एक्सएल सिनेमा पहावा. मला माहित आहे गेल्या काही महिन्यात अनेक सिनेमांनी बॉक्सऑफिसवर मान टाकली. सगळं सिनेमाच्या कथानकावर आधारित आहे. त्यामुळे मेकर्सवर सध्या जबाबदारी आहे की त्यांनी चांगला कॉन्टेन्ट द्यावा. ट्रोलिंगबाबत बोलायचं तर, लोक काय लिहितात ते मी वाचत नाही. मी फक्त माझे फोटो शेअर करते, माझ्या कामाची अपडेट देते, मग त्यानंतर पुढे कोण त्यावर काय लिहितं ते वाचत नाही. माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकत नाही. पण स्वतःला करू शकता. त्यामुळे तेवढंच करा.’
Discussion about this post