Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तु नको भरवू प्रतीचावडी; भावाच्या समर्थनार्थ BB मराठीची मापं काढणारा आदर्श शिंदे झाला ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 4, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिजनमध्ये प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याचा भाऊ उत्कर्ष शिंदे सहभागी झाला आहे. त्यामुळे शोच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीबाबत आदर्श खडान खडा माहिती ठेवतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या चावडी दरम्यान शो चे होस्ट महेश मांजरेकर यांनी आठवड्याभरात घडलेले प्रसंग पाहून स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. गेल्या आठवड्यात हल्लाबोल टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये प्रचंड वाद झाले. याबाबत बोलताना मांजरेकरांनी उत्कर्षलासुद्धा झापला. तू आत्तापर्यंतचा घरातील सर्वात वाईट आणि पक्षपाती संचालक होतास, असे ते म्हणाले. तर याआधी त्यांनी उत्कर्षला ‘डबल ढोलकी’ असेही म्हटले होते. यानंतर आता आदर्शचे बंधुप्रेम इतके उफाळले कि त्याने थेट “BigBoss ची चावडीच double ढोलकी” असल्याचं म्हटलं आहे. यावर प्रेक्षकांनीही आदर्शची कानउघाडणी केल्याचे समोर येत आहे.

आदर्शने आपल्या भावाचे समर्थन करीत सोशल मीडिया फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या पोस्टमध्ये त्याने उत्कर्षचे समर्थन तर केलेच पण चक्क Bigg Boss मराठीची मापं काढली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले कि, जसा खेळ पूर्ण महाराष्ट्र बघतोय तशी चावडी ही संपूर्ण महाराष्ट्र बघते. तर fair तुम्ही पण खेळा. जे चुकतंय ते सांगा पण जे चांगलं करतात ते ही सांगा.. biased चावडी नको.. असं आदर्शने म्हटलं आहे. चावडीला fair game दिसला नाही आणि काही प्रेक्षकांना ही कळावं म्हणून सांगतोय, की BigBoss’च्या घरात मला चावडी पण double dholkich दिसते. चावडी म्हणते माझ्यासाठी B team जिंकली? (हल्ला बोल टास्कचा संदर्भ) B team थकली आणि त्यांना कळलं की हे bike वरुन उतरणार नाही. खेळ strategy चा आहे की रडायचा आणि give up करून sympathy मिळवायचा? कारण रडणाऱ्यांनाच प्रेम मिळतंय आणि खेळणारे वेडे ठरतात का? घरात प्रत्येकाला वाटत असतं की ते fair खेळत आहेत. Sympathy गोळा करायला आलात की खेळायला? हे का निदर्शनास आणून दिलं नाही?”

View this post on Instagram

A post shared by Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarshshinde)

Task group मधे येतात मग group साठी खेळल्यावर individual दिसत नाही सांगून biggboss स्पर्धकांसोबत doubleढोलकीपणा करतात त्याचं काय? “मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. माझ्या गावाला संतांची भूमी म्हटलं जातं म्हणून मी माज करायचा? सोलापुरातल्या स्पर्धकाने माज करु नये का? पुण्यातल्या स्पर्धकांचं काय? मुंबईतल्या? तुम्ही माज दाखवायला आलात की खेळायला? Double Dholki कोण? Favouritism कोण करतंय? हा भेद भाव कशासाठी? जरा भान असू द्या. जे घडतंय ते चुकिचं घडतंय असं प्रेक्षकांना ही वाटतंय. उत्कर्ष शिंदे खेळायला गेलाय, रडून sympathy मिळवायला नाही. माझा भाऊ प्रत्येक criticism gracefully घेतोय याचा मला अभिमान आहे. भेद भाव करू नका आणि प्रेक्षकांची दिशाभूल करू नका”.

View this post on Instagram

A post shared by Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarshshinde)

हि भली मोठी पोस्ट वाचल्यानंतर काही स्पर्धकांचा उद्रेक झाला आणि त्यांनी आदर्शची कानउघाडणी केली. तर काहींनी त्याची उलट तपासणी घेतली. भावाची वकीली करायची गरज नाही मित्रा….हा गेम आहे..असे एका नेटकऱ्याने लिहिले. तर, दादा तु नकोस भरवू #प्रतीचावडी…… हा गेम शो आहे त्यानुसार चालू दे असेही एकाने म्हटले. आणखी एकाने लिहिले कि, आम्ही ह्या पोस्ट शी सहमत नाही……हा Bigg Boss Show आहे…इथे जे दिसत तेच असत…..कोण किती fair खेळतय दिसतय आम्हाला उत्कर्ष चुकलाय तर आम्ही चुकलायच बोलणार…. अरेरे आम्ही तुम्हाला खरच एक सच्चा कलावंत समजत होतो खुप आदर वाटत होता तुमच्या बद्दल पण तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ चाहाड्या करण्यात व्यर्थ करत आहात, असेही एकाने म्हटले.

   

तर आणखी एका नेटकऱ्याने तर संताप व्यक्त करत म्हटले कि, अरे आदर्श भावा उघड उघड आहे मिरचीची धुरी चालते आणि मिठाचं पाणी चालत नाही आम्ही काय आंधळे नाहीत हे आम्हाला सगळं दिसतं तुझा भाऊ किती पार्शल संचालक आहेत ते इतका तुला राग येत असेल तर सरळ भावाला घरी घेऊन जा त्याची लायकी कळली आहे… पहिल्यांदा छान वाटलं नंतर तो त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली संगत गुण बाकी काहीच नाही.

Tags: Aadarsh ShindeBigg Boss Marathi 3Facebook PostSocial Media TrollingUtkarsh Shinde
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group