हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत गाजत असलेली लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ हि दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्टमूळे आणखीच रंजक होऊ लागली आहे. दरम्यान या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकांच्या अगदी मनाजवळ आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हि प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य झाली आहे. त्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या पोस्ट चर्चेत येत असतात. यावेळी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर कोलाजमध्ये बऱ्याच जणांचे फोटो शेअर करून त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या निर्धास्त काम करण्यामागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिने हि पोस्ट समर्पित केली आहे.
तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, अरुंधती म्हणून आपण सर्व मला रोज आई कुठे काय करते ह्या दैनंदिन मालिकेत पाहता… पण मधुराणी म्हणून माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही एक स्वतंत्र डेली सोप चालूच असतो . जसे अरुंधतीच्या आयुष्यात चढ उतार येतात तसे माझ्याही आयुष्यात चालू असतात. गेले २ वर्ष मी ही मालिका करतेय. शूट मुंबईत असतं आणि माझी मुलगी आणि नवरा पुण्यात…! स्वरालीला मी खूपखूप दिवस भेटत नाही. तिच्या आयुष्यातल्या काही छोट्या पण निरागस आनंदात मी नसते. कधी तिच्या छोट्या मोठ्या आजारपणात मी नसते… कधीकधी मी २० /२० दिवस तिला भेटू शकत नाही. काम करताना हे सल आणि मुलीची ओढ आणि आठवण सतत माझ्याबरोबर असते … पण तिची काळजी अशी नसते. कारण प्रमोद त्याचे व्याप सांभाळून अतिशय मायेने सगळं करतो. पण ह्यात अतिशय मोलाचा वाटा आहे तो आमच्या support स्टाफचा.
View this post on Instagram
पुढे लिहिले कि, स्वरालीला शाळेसाठी तयार करणे, नेऊन सोडणे (तिची शाळा व्यवस्थित ऑफ line सुरू आहे … त्याबद्दल नंतर लिहीन), तिच्या आवडीचं खायला करणे, खायला घालणे, तिच्याशी खेळणे, तिची नाटकं सहन करणे, तिच्या इतर activitiesसाठी पाठवणे.… ही सगळी आणि त्याहीपेक्षा कितीतरी जास्त काम ही सगळी मंडळी अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने करतात म्हणून मी निर्धास्तपणे काम करू शकते. आपण भरतकामाची नक्षी पाहतो आणि त्याचं कौतुक करतो पण मागच्या बाजूला वेगळी वीण असते. अनेक टाके आणि गाठीही असतात त्या आधारावर ते नक्षीकाम उभं असतं. प्रमोद आहे, माझी आईही असते. त्याच बरोबर हा इतका प्रेमळ आणि खंबीर स्टाफ आहे म्हणून अरुंधती आहे. विजय, अमोल, अनिता, ज्योती, अनुराधा, आशा, ऋतुजा, अमृता….तुम्हाला भरभरून प्रेम.
Discussion about this post