हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वात ‘आई कुठे काय करते’ या मराठी मालिकेने अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावरील पकड कायम ठेवली आहे. पण मध्यंतरीच्या काळात मालिकेतील विविध ट्विस्टमुळे प्रेक्षक काहीसे नाराज झाले. सुरुवातील मालिकेचा ढंग आणि कथानक प्रेक्षकांच्या काळजाला हात घालताना दिसलं. पण आता या मालिकेतील काही ट्विस्ट आणि कथानकाची भरकटणारी वाट हि प्रेक्षकांना मनस्ताप देते आहे. या मालिकेचे कथानक मूळ ट्रॅक सोडून भलतीकडेच वाळू लागलं आहे असे अनेकांचे म्हणणे आहे आणि म्हणून आता हि मालिका बंद करा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत.
आई कुठे काय करते हि मालिका नेहाचं टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल राहिली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून मालिकेचे कथानक कुठून कुठे चालले आहे याचा काही संदर्भच लागेनासा झाला आहे. त्यामुळे ही मराठी मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत असल्यामुळे तिच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षाही तशाच राहिल्या आहेत. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर मालिका नुसती रटाळ होत नाही तर स्ट्रेस देणारी ठरते. तसेच काहीसे या मालिकेबाबत झाले. मालिकेत सुरु असलेले कथानक हे भरकटलेले असून याचा समाज मनावर वाईट परिणाम होऊ शकतो असे प्रेक्षकांनी म्हटले आहे. अनेकांनी हि मालिका लवकरात लवकर बंद करा अशीही मागणी केली आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका खरतर आई अर्थातच अरुंधती या पात्राभोवती फिरणारी आहे. तसे मालिकेच्या सुरुवातीलामालिका योग्य दिशेला जात होती. पण आता मात्र मालिकेतील बुद्धिबाह्य विषय वाढत आहेत. वारंवार स्त्रीचा केला जाणार अपमान, तिची अवहेलना, तिच्या चारित्र्यावर भाष्य करणे हे या कथानकाला शोभत नाही. शिवाय या मालिकेत ज्याचे त्याचे प्रेम प्रकरण आणि चुका करून वारंवार लपवा लपवी करणारे काही किस्से घडले. त्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत म्हटलंय कि, यात आई कुठे..? आईच्या नावाने मालिका सुरु करून नुसती प्रेम प्रकरण दाखवणं चालू आहे. त्यापेक्षा हि मालिका बंद करा.
Discussion about this post