हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील मालिका ‘आई कुठे काय करते’ हळू हळू टीआरपीच्या रेसमध्ये मागे पडू लागली आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नानंतर काही काळ मालिकेने चांगला जोर धरला होता. पण अचानक येणारे विविध ट्विस्ट हे कौटुंबिक मालिकेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे म्हणत प्रेक्षकांची मोठी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत ईशाच्या साखरपुड्यावरून होणारे वाद मालिकेला रटाळ बनवत होते. यानंतर आता अभिषेकच्या अपघाताने आणि अनिरुद्ध- संजनाच्या भांडणाने मालिकेत आणखीच ट्विस्ट येणार आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या अलीकडेच प्रसारित झालेल्या भागात इशा तिच्या साखरपुड्याच्या जागेवरून सगळ्यांशी भांडताना दिसली. आपला साखरपुडा मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा असं तिने सगळ्यांना बजावून सांगितलं आहे. ‘माझं हे स्वप्न आहे. या सगळ्या गोष्टी एकदाच होतात मग त्या छोट्या का करायच्या’, असं म्हणत इशाने आपला संताप व्यक्त केला. दरम्यान तिच्या हट्टापुढे घरच्यांना झुकावं लागणार असं दिसत आहे. तर दुसरीकडे अभिषेकचा अपघात झाल्याने अनघा आणि अरुंधती चिंतेत पडले आहेत.
एका वृद्ध गृहस्थांना वाचवताना गाडी स्लिप झाल्याने अभीचा अपघात झाला आहे. या अपघातात त्याच्या हाताला, पायाला अन डोक्याला गंभीर मार बसला आहे. त्याची अवस्था पाहून घरातील सगळ्यांनाच ढाका बसला आहे. या परिस्थितीत अनघा त्याचा आधार होताना दिसणार आहे. त्यामुळे आता पुन्हा नात्याची समीकरणं बदलणार हे नक्की.
याशिवाय संजना नाईट शिफ्टच्या कामासाठी निघताना अनिरुद्धचा त्रागा केल्याने त्यांच्या नात्यातला दुरावा आणखीच वाढणार आहे. तर दुसरीकडे ज्या मसाल्याच्या हातांमूळे अनिरुद्ध अरुंधतीवर चिडायचा त्याचं मसाल्याच्या हातांचं आशुतोष कौतुक करत आहे. यामुळे अरुंधती पुन्हा भूतकाळात जाऊन येणार आहे.
Discussion about this post