हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 28 डिसेंबरला त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर खान चक्क गुजरातला गेला आहे. तेही गीरचं अभयारण्य बघायला.आमिर खान त्याच्या चार्टर्ड प्लेनने शनिनारी रात्रीच पोरबंदरला दाखल झाला. त्यावेळी त्याला अनेक चाहतेही भेटले. त्यानंतर आपल्या कुटुंबासोबत तो एका बसने जुनागढला रवाना झाला.
‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. आमिर आणि किरणची लव्हस्टोरीही अतिशय भन्नाट आहे. याबद्दल आमिर म्हणतो, ‘ 2001 साली मी ‘लगान’ फिल्मचं काम करत होता. त्यावेळी किरण राव या फिल्मची असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. त्यावेळी आमची एकमेकांशी फक्त ओळख झाली होती. माझ्या घटस्फोटानंतर एकदा मी आणि किरण अर्धा तास फोनवर बोलत होते. फोन ठेवल्यानंतर मला तिच्याशी आणखी बोलावसं वाटत होतं. या फोन कॉलनंतर आम्ही एकमेकांना भेटायला लागलो. आणि त्यानंतर दीड वर्षांनी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.’ आमिर खान आणि किरण रावच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत.
आमिर खान यंदा त्याच्या लग्नाचा वाढदिवस थोड्या हटके पद्धतीने साजरा करत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, प्राण्यांसोबत त्याचा वाढदिवस साजरा होणार आहे. सलमान गीर सफारीला निघाल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. यावेळी त्याचं कुटुंबही त्याच्यासोबत उपस्थित होतं. या परिसरात 2 -3 दिवस मुक्काम करुन तो घरी परतणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post