Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शिंदे साहेब.. परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं; राजकीय वादळात आरोह वेलणकरची उडी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 22, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र
Aroh Welankar
0
SHARES
35
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांना राजकीय क्षेत्रात चालू असणाऱ्या घडामोडींची जाण असते,. शिवाय त्या विषयावर बेधडक बोलणेही हे कलाकार पसंत करतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता आरोह वेलणकर. तो अभिनय क्षेत्रासह सामाजिक कामातही बराच सक्रिय आहे. यामुळे साहजिकच राजकीय विश्वावरही तो भाष्य करतो. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एकनाथ शिंदे साहेबांना टोला लगावला आहे.

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022

सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे सरकारवर गदा आली आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्यासह महाविकास आघाडीवर अनेकदा टीका करण्यात आधीच आरोह पुढे असतो. त्यात गेले दोन दिवस महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरु आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेशी बंड करून वेगळाच डाव टाकलाय. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन ते राज्याबाहेर रवाना झाले. ज्यामुळे राजकारण ढवळून निघाले. ते बराच वेळ ‘नॉट रिचेबल’ झाल्यानंतर एक ट्विट समोर आलं. ‘आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,’ असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले. यावरूनच आरोह वेलणकरने एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलंय.

परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं. 🙏🏽 https://t.co/Y0xRK8xSdl

— Aroh Welankar (@ArohWelankar) June 21, 2022

‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,’ असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आणि त्यावर आरोह वेलणकरने रिट्विट करत ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असा टोला शिंदेंना लगावाला आहे. त्याआधी ‘संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये झालेला गोंधळ आणि अनागोंदी पाहावी’, असेही त्याने म्हटले होते.

Tags: Aroh VelankarEknath ShindeShivsenaTweeter Postviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group