हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि लोकप्रिय हिंदी रिऍलिटी शो बिग बॉस १६ चा टीआरपी सध्या गगनाला भिडतो आहे. ज्यामुळे शोच्या १३ आठवड्यांमध्ये आणखी ४ आठवड्यांची भर पडली आहे. हा शो जवळपास अंतिम टप्प्यात असताना हि आनंदाची बातमी प्रेक्षकांना मिळाल्यामुळे प्रेक्षक खुश आहेत. तर दुसरीकडे या शोमधील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला स्पर्धक अब्दु रोजिक काही कारणास्तव शोमधून बाहेर गेला होता. त्याला जाणून बुजून बाहेर काढल्याचे वारंवार बोलले गेले. यामुळे कुठेतरी प्रेक्षक नाराज असल्याचे मेकर्सच्या लक्षात येताच आता मेकर्सने त्याला शोमध्ये पुन्हा बोलावण्याचा विचार केला आहे.
बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये उंची लहान पण कीर्ती महान असा अब्दु रोझीक घरातील सदस्यांचा आणि प्रेक्षकांचा फारच लाडका राहिला. त्याचा स्वभाव, त्याची मजा मस्ती, त्याच गाणं सगळं काही शोसाठी फारच मनोरंजक होते. असे असतानाही जेव्हा अब्दू त्याला मिळालेली एक मोठी संधी घेऊन घराबाहेर आपले काम पूर्ण करण्यासाठी आला तेव्हा प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्याला मुद्दाम घराबाहेर काढले असे आरोप मेकर्सवर लावण्यात आले. प्रेक्षकांच्या नाराजीचा सूर पाहून मेकर्सने आता त्याला पुन्हा एकदा शोचा भाग बनविण्याचा विचार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दू रोजिक बिग बॉस १६ मध्ये परतणार असून तो सध्या घरामध्येच आहे. त्याची झलक या वीकेंड का वारमध्ये पहायला मिळणार आहे. त्याच्या येण्याने बिग बॉसच्या घरातला आनंद पुन्हा येणार आहे. त्याला पाहून घरातील प्रत्येक सदस्य खुश होताना दिसेल.
एव्हढ्या सगळ्यात शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे खूपच आनंदी होताना दिसणार आहेत. पण महत्वाची बातमी अशी आहे कि, अब्दु रोझीक आता पुन्हा शोमध्ये जरी आला तरीही त्याला जानेवारीत हा शो काहीही करून सोडावा लागणार आहे. कारण, बाहेरील कामाच्या कमिटमेंटमुळे त्याला जानेवारी महिन्यातच कोणत्याही परिस्थितीत शो सोडावा लागणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अशीच चर्चा सुरु आहे.
Discussion about this post