हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १६ व्या सिजनने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या सिजनमधील प्रत्येक सदस्य प्रेक्षकांसाठी खास आहे. पण या खास स्पर्धकांच्या लिस्टमध्ये सगळ्यात वर आहे तो लाडूकला अब्दू. मध्यंतरी कामासाठी अब्दू घराबाहेर पडला होता आणि तो पर्व यावा यासाठी ट्विटरवर ट्रेंड सुरु होता.
यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हि बातमी अशी आहे कि, प्रेक्षकांचा लाडका अब्दू रोझिक आता लवकरच पुन्हा एकदा शोमधून एक्झिट घेणार आहे. फक्त यावेळी तो पुन्हा येणार नाही असे बोलले जात आहे.
एका फॅन पेजने केलेल्या दाव्यानुसार, अब्दू रोझिक १२ जानेवारी २०२३ रोजी बिग बॉसचा शो सोडणार आहे आणि हा निर्णय त्याने आपल्या उर्वरित कामाच्या पूर्ततेसाठी घेतला आहे. बिग बॉसच्या १६ व्या सीजनचा कालावधी वाढल्यामूळे अब्दुला या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या घरात सध्या फॅमिली वीक सुरु झाला आहे.
घरात प्रत्येकाच्या कुटुंबातील एक व्यक्ती त्यांच्या भेटीसाठी येत आहे. तर आता अब्दुसाठी घरात कोण एंटर होणार याबाबत फारच उत्सुकता आहे. असं बोललं जात आहे कि, अब्दूला बिग बॉसमधून घेऊन जाण्यासाठी कुणीतरी स्पेशल व्यक्ती येणार आहे आणि यावेळी जेव्हा तो घराबाहेर पडेल तो थेट फिनालेतच भेटीसाठी येईल.
आतापर्यंत बिग बॉसच्या घरात अब्दूने आपल्या स्वभावाने, जादुच्या झप्पीने आणि गोड स्माईलने सगळ्यांना वेड लावलं आहे. अब्दुची लोकप्रियता प्रचंड आणि तुफान वाढली असताना त्याला कामामुळे या खेळाचा निरोप घ्यावा लागणार आहे.
गेल्यावेळी अब्दू घरातून बाहेर पडला होता तेव्हा चर्चेत असेही बोलले गेले होते कि त्याला जानेवारीमध्ये पुन्हा एकदा घराबाहेर पडावे लागेल आणि तसेच होणार असल्याचे आता सांगितले जात आहे. आता अब्दू खरंच घराबाहेर पडणार का..? हे तर आगामी भागांमध्येच कळेल.
Discussion about this post