हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात महाराष्ट्रात इतके मोठे सत्ता नाट्य झाले कि त्यात जनता भरडून निघाली. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण इतके तापले आहे कि रोज नवी ब्रेकिंग समोर येते. दरम्यान यामध्ये महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये नव्या सरकारचा परिणाम विविध क्षेत्रांवर होणार यात काहीच वाद नाही. दरम्यान सिने विश्वातील दिग्गजांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच पार्श्वभूमिवर अभिनेता आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनीही एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरते आहे.
दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी कोणत्याही प्रकारची राजकीय प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांची पोस्ट हि राज्यातील आजच्या राजकीय परिस्थितीशी कुठे ना कुठे संबंध ठेवणारी आहे यात काही शंकाच नाही. नेटकऱ्यांनी देखील अभिजित पानसे यांची ही पोस्ट राजकारणाशी जोडली आहे. या पोस्टमध्ये अभिजित पानसे यांनी लिहिले आहे कि, ‘महाराष्ट्रात ‘रानबाजार’ सुरूच आहे…आता “राजी- नामा” देतोय!’ हे वाचल्यावर कुणालाही वाटेल कि पानसे आता राजीनामा देत आहेत. पण खरंतर अभिजीत यांनी लिहिलेलं कॅप्शन त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा आहे. त्यांनी त्यांच्या नव्या प्रोजेक्टचा टीजरसुद्धा शेअर केला आहे. या टीजरमध्ये असंही म्हटलंय की, ‘२० मे ला रानबाजार आला… तो महाराष्ट्रात, देशात सुरूच आहे! पुन्हा एकदा नवीन युती झाली आहे’.
‘राजी-नामा’ ही आगामी नवीकोरी वेबसीरिज असून ती लवकरच ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत ‘राजी-नामा’चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे. याआधी प्लॅनेट मराठीसोबत अभिजीत पानसे यांनी ‘रानबाजार’ ही थरारक अशी सीरिज रिलीज केली आहे. जी तुफान गाजतेय. ‘रानबाजार’चे दिग्दर्शनही अभिजित पानसे यांचेच आहे. तर निर्मितीही ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी केले आहे. यांनतर आता चर्चा आहे ती ‘राजीनामा’ची. माहितीनुसार, प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित ‘राजी-नामा’ची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.
Discussion about this post