Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांची अभिषेक बच्चनने केली हवा गुल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2021
in गरम मसाला, बातम्या, वेबसिरीज, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Abhishek Bacchan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘द बिग बुल’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली असून, डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हर्षद मेहता यांनी १९९२ साली केलेल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारित आहे. कुकी गुलाटी दिग्दर्शित या चित्रपटाला मिश्रित समीक्षा मिळाल्या आहेत. काही लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर काही लोक अभिषेकच्या अभिनयाच्या कौशल्यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात लागले आहेत. मात्र यावेळी अभिषेक बच्चन यांनी योग्य उत्तर देऊन अशाच एका युजरच्या तोंडाला टाळे लावले आहे.

As usual @juniorbachchan doesn't disappoint you with his 3rd rate so called acting in a poorly scripted & badly filmed #TheBigBull @pratikg80 & #Scam1992 are far superior by miles.@ajaydevgn @DisneyplusHSVIP

— डॉ. सुशांत त्रिविक्रम जोशी 🇮🇳 (@sushanthjoshi) April 8, 2021

एका युजरने लिहिले आहे कि, ‘अभिषेक बच्चनने नेहमीप्रमाणेच थर्ड-रेट अभिनय, खराब स्क्रिप्ट आणि निरुपयोगी चित्रपटाने निराश केले नाही. ‘स्कॅम १९९२’ यापेक्षा खूप चांगला होता.’ यावर अभिषेक बच्चनने वापरकर्त्याच्या या समीक्षेला पातळी न सोडता उत्तर दिले आहे. या ट्विटला उत्तर देताना अभिषेक म्हणतो, ‘अरे माणसा! मी तुम्हाला निराश केले नाही, म्हणून मला खूप आनंद झाला आहे. चित्रपट पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.’ अभिषेक बच्चन यांच्या ‘द बिग बुल’ या चित्रपटाची तुलना वेब सीरिज ‘स्कॅम १९९२’ सोबत केली जात आहे. पण या चित्रपटातील अभिषेकचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो आहे. अभिषेकने आपल्या दमदार अभिनयाने त्याच्या ‘गुरु’ चित्रपटाची आठवण करून दिली, असे मत काही चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

Hey man, as long as I’ve not disappointed you, I’m happy. Thank you for taking the time out to see our film. 🙏🏽

— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) April 8, 2021

अभिषेक बच्चन याचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार होता, तर तेव्हाच त्याचे वडील अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘चेहरे’ हा देखील ९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. त्यामुळे पिता आणि पुत्रात जोरदार टक्कर होण्याची लक्षणे स्पष्ट दिसत होती. परंतु, तसे होऊ शकले नाही. कारण कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर ‘चेहरे’ चित्रपटाचे रिलीज सध्या पुढे ढकलण्यात आले आहे. ‘द बिग बुल’मध्ये अभिषेक बच्चनसोबत अभिनेत्री निकिता दत्ता आणि इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हर्षद मेहता यांनी शेअर बाजारामध्ये केलेल्या घोटाळ्याबद्दल या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अनेक गुन्हे केल्यानंतर त्याला अटकही झाली होती. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि आनंद पंडित यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Tags: ajay devganbollywood actorCritic CommentOTT FilmThe Big Bull
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group