Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चनला गंभीर दुखापत; लीलावती रुग्णालयात केले दाखल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 24, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या ३ दिवसांपूर्वी पत्नी ऐश्वर्या राय व मुलगी आराध्या यांना सोडण्यासाठी विमानतळावर आला होता. तेव्हा मीडिया फोटोग्राफेर्सच्या कॅमेऱ्यात त्याच्या हाताला असलेले बँडेज दिसले होते. यानंतर अभिषेकचे हे फोटो क्षणात व्हायरल झाले आणि त्याला दुखापत झाल्याचे समोर आले होते. मात्र यानंतर २२ ऑगस्ट २०२१च्या रात्री अभिषेकचे वडील, बहिण आणि पत्नी ऐश्वर्या लीलावती हॉस्पिटलबाहेर दिसले होते. यानंतर अभिषेकला रात्री रूग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली. अभिषेकच्या चाहत्यांमध्ये त्याला झालेल्या दुखापतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या दुखापतीचे कारण अभिषेकला शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार,अभिषेकला आगामी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान हाताला दुखापत झाल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पूर्ण वृत्तानुसार, अभिषेक चेन्नईमध्ये आगामी चित्रपटाचे शूटींग करत असताना सेटवर त्याला दुखापत झाली. त्याच्या तळहाताच्या बोटांमध्ये फ्रॅक्चर असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र अद्याप त्याच्या कुटुंबाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. माहितीनुसार, अभिषेक ‘र्ओ सेरूप्पु आकार ७’ च्या हिंदी रिमेकच्या शूटींगमध्ये व्यस्त होता. हा चित्रपट एक अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमा आहे. मुख्य म्हणजे, अभिषेक एकमेव अभिनेता यात असणार आहे. उर्वरित कलाकारांच्या केवळ आणि केवळ आवाजांचाच यात वापर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

 

याआधीही एकदा अभिषेक शूटिंगदरम्यान असाच जखमी झाला होता. तेव्हा धूम ३ या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते आणि या दरम्यान अभिषेकच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. तर ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून ‘पोन्नयिन सेलवन’ चित्रपटाचे शूटींग करत आहे. यामुळे ३ दिवसांपूर्वीच ती आराध्यासोबत शूटींगसाठी रवाना झाली होती. मात्र अभिषेकला रूग्णालयात दाखल केल्याची बातमी ऐकून ती प्रायव्हेट जेटने लगेचच मुंबईला पोहोचली

Tags: aishwarya rai bacchanInjury During shootLilavati Hospital
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group