Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘राणी आली.. महाराणी आली’; अभिनेत्री वीणा जगतापचा राजेशाही साज श्रुंगार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Veena Jagtap
0
SHARES
783
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका क्षेत्रात कार्यरत असणारी मराठी अभिनेत्री वीणा जगताप प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. वीणाने विविध मालिकांमधून विविध पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. शिवाय बिग बॉस मराठीत सहभागी झाल्यामुळेही तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये बरीच वाढ झाल्याचे दिसून आले. अलीकडे काही काळापासून ती फारशी कार्यरत नसली तरीही सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. सध्या सोशल मीडियावर तीचा नवाकोरा क्वीन लूक चांगलाच चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap💝 (@veenie.j)

अभिनेत्री वीणा जगतापने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर आपलं नवंकोरं फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिने राणीचा लूक परिधान केला आहे. या लूकमध्ये तिच्या चेहऱ्यावरील ग्लो फोटोशूटला आणखीच तेजस्वी बनवितो आहे. या फोटोंमध्ये वीणाने लाल रंगाचा रजवाडी लेहंगा परिधान केला आहे. तर यासोबत साजेशा ज्वेलरीदेखील तिने परिधान केल्या आहेत. इतकेच नव्हे तर हातात लाल जुडा आणि केसांची सुंदर अशी वेणी घातल्यामुळे ती आणखीच सुंदर दिसतेय. कपाळावर लाल बिंदी मांग टीका परिधान केल्यामुळे वीणाचा लूक जबरदस्त दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap💝 (@veenie.j)

वीणा जगतापचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या लूकमध्ये ती एखाद्या घरंदाज राजेशाही घराण्यातील राणीसारखी भासते आहे. शिवाय तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘काय आहे राणी.. राजाशिवाय .. राणी’. वीणाच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या या लुकला पसंती दिली आहे. अनेकांनी या फोटोंवर कमेंट करताना फायर ईमोजी आणि हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap💝 (@veenie.j)

वीणा जगतापच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, वीणाने राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून पदार्पण केले होते. यानंतर ती बिग बॉस मराठी २ मध्ये दिसली होती. यावेळी तिची आणि बीबी मराठी २ चा विजेता शिव ठाकरे यांची केमिस्ट्री चर्चेत राहिली होती. याशिवाय तिने आई माझी काळूबाई या मालिकेतही मुख्य भूमिका साकारली होती.

Tags: Instagram PostMarathi ActressVeena JagtapViral PhotosViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group