Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शरद पवार मरतील तो खरा स्वातंत्र्य दिवस’; केतकीवर कारवाई मग रोहन जोशीवर का नाही..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
0
SHARES
3.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या विषयी अपमानजनक आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला तब्बल ४० दिवस पोलिसांचा पाहुणचार घ्यावा लागला होता. हि घटना सोशल मीडिया इंस्टाग्रामवर, फेसबुक, ट्विटर, प्रसार माध्यमे अशा प्रत्येक माध्यमातून उचलली गेली. यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. कोणत्याही ख्यातनाम व्यक्तीविषयी आक्षेपार्ह बोलणे, लिहिले हा एक गुन्हा मानला जातो. यामुळेच केतकीने तिच्या वाटेचा वनवास भोगला. या घटनेचा संदर्भ देत लेखिका शेफाली वैद्य यांनी आणखी एका व्यक्तीने केलेली पोस्ट समोर आणत राष्ट्रवादीला परखड विचारणा केली आहे.

So @NCPspeaks filed a FIR and jailed #KetakiChitale for 40 days for merely sharing a post that didn’t even take anyone’s name, but they did nothing to Rohan Joshi even after this crass abuse of @PawarSpeaks @AjitPawarSpeaks? Where are all the NCP सतरंजी उचले now @supriya_sule? pic.twitter.com/JtFAljl9Bj

— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) September 21, 2022

कॉमेडियन रोहन जोशी याने आपल्या ट्विटर हँडलवर दिनांक १४ ऑगस्ट २०१२, ७ एप्रिल २०१३, ८ एप्रिल २०१३ आणि २९ मे २०१३ साली काही ट्विट केले होते. ज्यांचा संबंध थेट पवार कुटुंबाशी होता. या ट्विटमध्ये अतिशय खालील दर्जाची भाषा वापरत त्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी अपमानकारक वाक्यांचा वापर केला आहे.

यानंतर त्याने ट्विटरवरून अक्षरशः पळ काढत अकाऊंट डिलीट केले. मात्र तोपर्यंत हे ट्विट स्क्रिनशॉट आणि इतर माध्यमांमधून व्हायरल झाले होते. पण मूळ मुद्दा असा कि. अत्यंत घाणेरड्या भाषेचा वापर केलेले हे ट्विट्स असूनही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. मुख्य म्हणजे त्याने या ट्वीट्समध्ये थेट शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावांचा वापर केलेला आहे.

यावरूनच लेखिका शेफाली वैद्य यांनी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वेसर्वा यांना थेट विचारणा करणारे खरमरीत ट्विट शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘तर.. @NCPspeaks कडून FIR दाखल करून # केतकी चितळे हिला फक्त कोणाचेही नाव न घेणारी पोस्ट शेअर केल्याबद्दल ४० दिवस तुरुंगात डांबले.. पण त्यांनी रोहन जोशीला काहीही केले नाही. असे का..? @PawarSpeaks @AjitPawarSpeaks? कुठे आहेत राष्ट्रवादीचे सतरंजी उचले @supriya_sule ?’

या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया देणारे ट्विट शेअर केले आहेत. कुणी याला हिपोक्रसी म्हणत आहे. तर कुणी रोहन जोशीने शेअर केलेल्या आणखी अनेक आक्षेपार्ह ट्वीट्सचा संदर्भ जोडत आहे. तर काही नेटकरी केतकी आणि रोहन यांना वेगवेगळा न्याय का..? अशी विचारणा करीत आहेत.

Tags: Ajit PawarKetaki ChitaleNCPRohan JoshiSharad Pawarviral postviral tweetWriter Shefali Vaidya
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group