हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वात सुसाईड आणि संशयास्पद मृत्यूच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सोमवारी दिनांक २२ मे २०२३ रोजी दुपारी अंधेरी येथील त्याच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. त्याचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. मृत्यूपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यावरून त्याने मित्रांसोबत पार्टी केल्याचे दिसून येत आहे.
Actor Aditya Singh Rajput found dead at his apartment in Andheri area. Body sent for post-mortem. Investigation underway: Mumbai Police
(Pic: Aditya's Instagram) pic.twitter.com/1ZHbKB9ilp
— ANI (@ANI) May 22, 2023
एका नामांकित वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘आदित्यच्या मित्रांनी सर्वात आधी त्याला बाथरुमध्ये पाहिलं. त्यानंतर त्यांनी बिल्डिंगच्या वॉचमनच्या सहाय्याने आदित्यला रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केलं. सूत्रांनुसार, आदित्यचा मृत्यू हा ड्रग्जचे ओव्हर डोस झाल्यामुळे झालेला असू शकतो, असा अंदाज आहे. तरीही अजून तपस पूर्ण न झाल्यामुळे याबाबत काहीच स्पष्ट सांगता येणार नाही. आदित्यने निधनापूर्वी काही तास आधी त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीत एक फोटो शेअर करत त्याने लिहिलेलं कि, ‘Sunday Funday With Besties’. हि पोस्ट आणि पार्टी त्याची शेवटची ठरली.
अभिनेता आदित्य सिंग राजपूतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलिसांना रिपोर्टची प्रतीक्षा आहे. आदित्य सिंग राजपूत हा दिल्लीचा रहिवासी होता आणि त्याने मनोरंजन विश्वात बराच काळ काम केले आहे. ३०० हून अधिक जाहिरात व्हिडीओ, तसेच रिअॅलिटी शो, सिनेमे अशा विविध माध्यमातून त्याने मनोरंजन विश्वात काम केले आहे.
‘मैंने गांधी को नही मारा’ आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या चित्रपटात त्याने काम केलं होतं. सुरुवातीला मॉडेल म्हणून काम करता करता आदित्य गेल्या काही काळात कास्टिंग डायरेक्टरचे काम करत होता. आदित्यने ‘गंदी बात’ या वेबसीरीजमध्येही काम केलं आहे.
Discussion about this post