Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता अनिकेत विश्वासराव पूर्व पत्नीसह बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार.. ?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 17, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss 4
0
SHARES
2.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वात बिग बॉसचे वारे वाहताना दिसत आहेत. कलर्स हिंदीवर ‘बिग बॉस’चे १६ वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. शिवाय मराठी ‘बिग बॉस’चे ४ थे पर्व देखील आगामी काळात सुरु होत आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चा फक्त आणि फक्त बिग बॉसची होताना दिसते आहे. सूत्रानुसार येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठी ४ सुरु होणार आहे. शिवाय महेश मांजरेकरच या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. नुकतेच या सिजनमध्ये कोण सहभागी होणार याची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार अभिनेता अनिकेत विश्वासराव पूर्व पत्नीसह बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची कुणकुण लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

वाद, भांडण, दंगा, प्रेम अशा विविध भावनांनी परिपूर्ण असणारा हा शो येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे या शोमध्ये कोणकोण सहभागी होणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि त्याची घटस्फोटीत पत्नी स्नेहा चव्हाण बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अभिनयापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेला अनिकेत विश्वासराव बिग बॉसच्या घरात येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्याचे चाहते आनंदी आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aniket Vishwasrao (@aniketvishwasrao)

मात्र त्याची पूर्व पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण देखील बिग बॉसच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण देखील आहे. मध्यंतरी दोघांनीही घटस्फोट घेतल्यानंतर हे दाम्पत्य चांगलेच चर्चेत आले होते. स्नेहा चव्हाणने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गंभीर आरोपांखाली पोलिसात तक्रार दाखल केली होती.

View this post on Instagram

A post shared by Aniket Vishwasrao (@aniketvishwasrao)

मात्र यावर अनिकेतने कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता बिग बॉस मध्ये हे दोघे खरंच आले तर काय..? ते एकत्र येतील का भांडतील..? असा प्रश्न सगळ्यांनाचं पडला आहे. कारण बिग बॉसच्या गेल्या पर्वत स्नेहा वाघ आणि आविष्कार दार्व्हेकर सहभागी झाले होते. त्यांच्या नात्यातील ट्विस्टमुळे हे पर्व चांगलेच गाजले होते.

Tags: Aniket VishwasraoBigg Boss Marathi 4Sneha ChavhanViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group