हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या बघता बघता उचांक गाठू लागली आहे. परिणामी रुग्णांना वैद्यकिय सेवांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णांसाठी बेड नाही, ऑक्सिजन नाही त्यात भर म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठाही अपूरा पडू लागला आहे. यामुळे कित्येकांना आपला प्राण देखील गमवावा लागला आहे. सद्यःपरिस्थितीची दृश्ये अक्षरशः मन हेलावणारी आहेत. अश्यावेळी अनेकजण स्वखुशीने लोकांच्या मदतीसाठी सरावू लागले आहेत. यात कलाकार मंडळींनी देखील सहभाग घेतला आहे. लोकप्रिय अभिनेता भारत जाधव याने आपल्या छोट्याश्या प्रयत्नातून कोरोना बाधितांना मदत केली आहे. त्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असून इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
https://www.instagram.com/p/COAPDnOBa3f/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर एक पोस्ट नजरेत आली आणि मनाला पटल्यामुळे भरतने हि पोस्ट आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केलाय. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या आचरणातून ह्या पोस्टचा खरा अर्थ दाखवून दिलाय. भरतने आपला अनुभव आपल्या चाहत्यांसोबत एका पोस्टमधून शेअर केला आहे. तो म्हणाला, सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. “एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे…
माझ्या सोसायटी मधे ४ जण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट १ बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटी मधील २ रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्टा – औषधे देत होता, रिकाम्या फ्लॅट धारकांचा ६ महिन्याचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले. १५ दिवसांनी सर्व जण बरे झाले.आता तेच फ्लॅट इमरजेंसीसाठी राखूं ठेवले आहेत… हा छोटासा माझा प्रयत्न.. आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा.. हीच वेळ आहे पुढे होऊंन आपले कर्तव्य करण्याची.”
अशाप्रकारे उगाच फाफट पसारा न करता या पोस्टमधून या संकटाच्या काळात आपण काय करु शकतो आणि वेळेला एखाद्या कठिण प्रसंगाला कश्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो, हे त्याने सांगितले. तसेच पोस्टमध्ये, आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा.. हीच वेळ आहे पुढे होऊंन आपले कर्तव्य करण्याची.” असे लिहीत त्याने समाजाला एक सकारात्मक वाट दाखविली आहे. तसेच या गोष्टीचे स्वतः आचरण करून आपण इतरांना कशी मदत करू शकतो, हे त्याने दाखवून दिले आहे. या पोस्टने सध्या सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र आता वेळ आहे ती याचा अवलंब कोण कोण करीत आहे ते पाहण्याची.
Discussion about this post