Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

खेसारी लालचा कोलगेट डान्स वायरल; काही तासांतच ४ कोटी व्ह्यूजचा पल्ला पार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2021
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Khesari
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खेसारी लाल यादव हा एक भोजपुरी अभिनेता आहे. मात्र भारतातील सध्याच्या सर्वोधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून तो सारखा चर्चेत असतो. खरं तर अद्याप त्याने इतर कोणत्याही भाषांमध्ये काम केलेले नाही. मात्र त्याची गाणी देशभरातील प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यशस्वी आहेत. सध्या त्याचे नुकतेच एक गाणे आले आहे. जे रसिकांना नाचण्यासाठी प्रवृत्त करीत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे, त्याच्या या गाण्याला अगदी काही तासांतच प्रेक्षकांची इतकी पसंती मिळाली कि त्याला चार कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरुन खेसारी लालच्या फॅन फॉलोईंगचा अंदाज आपल्याला आलाच असेल.

खेसारी लाल म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीमधील हीट मशीन असे म्हटले जाते. अन् या हीट मशीनचं कोलगेट सॉन्ग चांगलंच चर्चेत आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री कनिष्का नेगी थिरकताना दिसत आहे. तिचा ग्लॅमरस लूक प्रेक्षकांना आणखीच भावतो आहे. देशभरातील लाखोंच्या संख्येने तिचे सोशल मीडियावर फॉलोवर्स आहेत. या गाण्यात दोन्ही लोकप्रिय कलाकार एका धमाकेदार गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडणे अगदीच स्वाभाविक आहे.

khesari-lal-yadav_1574499347

खेसारी ‘बिग बॉसच्या १३व्या सीजनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर सध्या अशी चर्चा आहे, की खेसारी लाल लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. सध्या तो एका भोजपूरी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर अलिकडेच त्याची महेश भट्ट यांच्यासोबत एक मिटिंग झाली होती. या मिटिंगचे फोटो देखील चर्चेत होते. त्यामुळे भोजपूरी सिनेसृष्टीतील हा सुपरस्टार आता बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका साकारणार की सहाय्यक भूमिका हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.

Tags: Bhojpuri ActorBigg boss 13khesari lal yadavLatest Trending VideoMahesh Bhatttrending
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group