Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता किरण माने ‘रावरंभा’ चित्रपटात साकारणार ऐतिहासिक भूमिका; पोस्ट लिहून दिली माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने याना अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले. या मालिकेमध्ये ते विलास पाटील हि भुमिका साकारत होते. मानेंनी आपल्या राजकीय भूमिका घेण्यामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकळ्याचा आरोप चॅनेल आणि प्रोडक्शनवर केला होता. यानंतर हा वाद चांगलाच उफाळला. यामध्ये विविध राजकीय पक्ष आणि अगदी राज्य महिला आयोगानेदेखील उडी घेतली. हे प्रकरण अद्याप संपलेले नसून तापलेले आहे. परंतु रुकेगा नहीं झुकेगा नहीं हे तत्त्व आजमावत किरण माने आगामी ऐतिहासिक चित्रपटात नवी भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव रावरंभा आहे.

किरण माने यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले कि, आनंद वो…निव्वळ आनंद… नविन भन्नाट जबराट नादखुळा भुमिका ! सोबत प्रतिभावानांची टीम !! आपन वास्तवात ज्या विचारधारेची ‘भुमिका’ घेत असतो…लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असनारी ‘भुमिका’ मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाय भावांनो !!! “शुटिंग सुरू झाल्यापासून फेसबुकवर किरण माने, न्यूज चॅनलवर किरण माने, पेपरमध्ये किरण माने, सेटवर आलं की समोर किरण माने आणि कॅमेरा लेन्समध्ये पाहिलं तरी किरण माने…” अशी चेष्टा करत पोट धरून हसनारे आनि त्याचवेळी सतत पाठीवर हात ठेवून बळ देनारे मराठीतले दिग्गज कॅमेरामन संजय जाधव.. सोबत अपूर्वा नेमळेकर,ओम भूतकर, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके.. टीव्हीवर माझ्यावर खोटे आरोप होत असताना, “आम्हाला माहीतीये ओ सर तुम्ही खूप चांगले आहात. कुणी काहीही म्हणू दे.” असं बोलुन मला दिलासा देणारी माझी गांववाली मोनालीसा बागल… आर्ट डिरेक्टर वासू पाटील.. माझ्या मातीतला, अतिशय भला ‘माणूस’ असलेला दिग्दर्शक अनुप जगदाळे… प्रचंड मोठ्ठा तामझाम असलेला भव्यदिव्य सिनेमा निर्माण करत असताना खर्चाच्या बाबतीत कसलीही तडजोड न करनारे निर्माते शशिकांत पवार… प्रताप गंगावणेंसारखा सिद्धहस्त लेखक.. आनखी काय पायजे?

View this post on Instagram

A post shared by Ravrambha – रावरंभा (@ravrambhafilm)

एक लै भारी किस्सा घडला परवा.. स्पाॅटबाॅय धावत-धावत व्हॅनिटीमध्ये आला… चेहर्‍यावर संताप दिसत होता.. “सर, फेसबुकवर एकानं तुमची टवाळी करत लिहीलंय.. ‘आता कसा बसलास घरी.. काम गेलं हातातनं.’ त्येच्यायला त्येच्या.. सर मला लै राग आलाय.. त्याला ओरडून सांगावं वाटतंय ‘आमचा सातारचा वाघ घरी बसनार्‍यातला नाय..’ तुमचा आत्ता शुटिंग करतानाचा फोटो टाकू का??” मी कसंतरी त्याला समजावलं की दुर्लक्ष कर.. काळ उत्तरं देतो सगळ्याची..बाजूला मी न्यायासाठी लढा देत असतानाच, दुसर्‍या बाजूला अशा व्यक्तीची भुमिका करत होतो ज्यानं परक्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हनून स्वत:चा जीव दिला. मुहूर्त होऊन माझं पहिलं शेड्यूल नुकतंच संपलं… प्रतिक्षा पुढच्या शेड्यूलची.. तोपर्यन्त न्यायाची दूसरी लढाई सुरू..या आठवड्यात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या, त्यातलीच ही एक… धन्यवाद अनुप..खूप खूप मनापासून आभार !!!

अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून यात मराठी इतिहासातील योद्ध्याचे आयुष्य उलघडणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव हे पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन करणार आहेत. कर्जतमधील एनडी स्टूडिओमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी समोर येणार आहे.

Tags: Anup JagdaleFacebook PostHistorical Upcoming MovieKiran ManeMarathi MovieMonalisa BagalRavrambhaSanjay Jadhav
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group