Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती… उसकी बदनामी शुरु की जाती है… !’; किरण मानेची वास्तवदर्शी पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 14, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल
Kiran Mane
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती… उसकी बदनामी शुरु की जाती है… ! अशी सुरुवात करत मराठमोळा अभिनेता किरण माने याने, वास्तववादी पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट अतिशय चर्चेत आहे. आपल्या पोस्टमध्ये किरणने मराठी कलाविश्वातील एका विशिष्ट गटावर निशाणा साधला आहे. जो गट प्रतिभावंत कलाकारांना गिळंकृत करू पाहतो, अश्या गटासाठी हि पोस्ट म्हणजे धगधगता निखाराच.

‘अस्सल प्रतिभावंतांनो, तुम्ही जीव ओतून प्रामाणिकपणे चांगलं काम करा… रोज ‘मरण’ अनुभवत पुढं जात रहाणं, नाहीतर सरळ हे क्षेत्र सोडून आपला कामधंदा सांभाळणं किंवा आत्महत्या करणं या तीन गोष्टींशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत’, अशी पोस्ट किरणने शेअर केली आहे. मराठी मनोरंजनविश्वात करिअर करणा-यांना कलाकारांना त्याने एक सल्लाही दिला आहे. ‘या क्षेत्रात लाईफलाँग करिअर करू इच्छिणा-या सर्वसामान्य वर्गातील कलाकारांनो… कळकळीची विनंती आहे… एकतर पूर्ण तयारीनिशी… संपूर्ण ताकदीनं या किंवा येऊ नका,’ असे त्याने लिहिले आहे. सध्या किरण ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत काम करतोय. यातील विलास पाटील ही व्यक्तिरेखा तो साकारतोय. याआधी त्याने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये सहकलाकाराची भूमिका बजावली आहे.

या पोस्टमध्ये किरण म्हणतोय, जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती…उसकी बदनामी शुरू की जाती है !…मराठी कलाप्रांताचा गळा ठरावीक बुरसटलेल्या विचारधारेच्या गटानं आपल्या जबरदस्त पकडीत दाबून धरलाय दोस्तांनो ! तुम्हाला माहितीय, किरण माने हवेतल्या गोष्टी बोलत नाही. तुकारामाची पताका हातात घेतलेल्या वारकर्‍याच्या रक्तात “अनुभवावाचून सोंग संपादणे” कदापी येणार नाही ! तुम्ही प्रतिभावान असाल-मेहनती असाल-आपलं काम खणखणीत वाजवत असाल… पण तुम्ही त्यांच्या ‘गटात’ न बसणारे – त्यांची विचारधारा न मानणारे असाल तर तुम्हाला मराठीत भयानक आणि जीवघेण्या संघर्षातून पुढे जाण्याशिवाय तरणोपाय नाही !! हो, तुम्ही कलावंत म्हणून सुमार दर्जाचे असाल, तर मात्र तुम्ही ‘सुरक्षित’ आहात. त्यांना शेजारी उभी करायला अशी बुजगावणी लागतातच. पण अस्सल प्रतिभावंतांनो, तुम्ही कित्त्तीही जीव ओतून – प्रामाणिकपणे चांगलं काम करा… रोज ‘मरण’ अनुभवत पुढं जात रहाणं, नाहीतर सरळ हे क्षेत्र सोडून आपला कामधंदा सांभाळणं किंवा आत्महत्या करणं या तीन गोष्टींशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

इतकेच नव्हे तर पुढे तुकोबांचा उल्लेख करीत किरण म्हणतोय, आपला तुकोबाराया या छळाबाबत बोलून गेलाय: “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग… अंतर्बाह्य जग आणि मन ! जिवाहि आगोज पडती आघात… येऊनिया नित्य नित्य वारि !! तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे… अवघियांचे काळे केले तोंड !!!”…’ते’ आधी तुम्हाला दुर्लक्षित करतात…नंतर तुम्हाला ‘डावलणं’ सुरू होतं…त्यानंतर तुम्हाला अपमानीत केलं जातं…… तरीही तुम्ही आपल्या कामाशी प्रामाणिक राहून नाणं वाजवत राहीलात तर तुमची खोटी ‘बदनामी’ हा हुकमी एक्का काढला जातो… त्यानंतरही तुम्ही जिद्दीनं, चिवटपणे, न थकता आपला झेंडा रोवत ‘अवघियांचे तोंड काळे’ करत राहिलात, तरच तुम्ही टिकू शकता ! या क्षेत्रात ‘लाईफलाॅंग करीयर’ करू इच्छिणार्‍या सर्वसामान्य ‘वर्गातील’ कलाकारांनो… कळकळीची विनंती आहे… एकतर ‘पूSSSर्ण’ तयारीनिशी… संपूर्ण ताकदीनं या किंवा येऊ नका. – किरण माने.

Tags: Facebook PostKiran ManeMulgi Zali Hostar pravahTrending Social Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group