Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भर रस्त्यात पेटली अभिनेत्याची गाडी; थोडक्यात वाचला मुलाचा जीव नाहीतर..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 16, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
K K Goswami
0
SHARES
222
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘शूssss कोई है’, ‘शक्तिमान’, ‘गुटुर गू’ अशा विविध मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातलेले प्रसिद्ध अभिनेते के. के. गोस्वामी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गोस्वामी यांचा मुलगा एका मोठ्या दुर्घटनेतून बचावल्याचे समजले आहे. मुंबईतील एसव्ही रोडवर त्यांच्या गाडीने पेट घेतला आणि यावेळी त्यांचा मुलगा नवदीप गाडी चालवत होता. या घटनेतून तो सुखरूप बचावला असला तरीही संपूर्ण गोस्वामी कुटुंबाला चांगलाच धक्का बसला आहे. या घटनेची माहिती स्वतः गोस्वामी यांनी सोशल मीडियावर पेटत्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by K K Goswami (@yours_k_k_goswami)

या व्हिडिओसोबत गोस्वामी यांनी लिहिले कि, ‘काल माझ्या गाडीमध्ये आग लागली होती.. पण आपल्या आशीर्वादाने माझा मुलगा थोडक्यात बचावला आहे’.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील एस. व्ही. रोडवर हि घटना घडली. अभिनेते के. के. गोस्वामी यांचा मुलगा नवदीप चारचाकीने आपल्या घरातून फिल्मिस्तान स्टुडिओजवळ असलेल्या कॉलेजला जात होता. यावेळी नवदीप कार चालवीत असताना गाडीने अचानक पेट घेतला आणि गाडीला पूर्ण आग लागली. यानंतर अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

View this post on Instagram

A post shared by K K Goswami (@yours_k_k_goswami)

या अपघातातून के. के. गोस्वामी यांचा मुलगा नवदीप अगदी थोडक्यात बचावला आहे. या दुर्घटनेत नवदीपला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र गाडीने अचानक पेट घेण्याचे कारण काय..? याचा तपास पोलीस करत आहेत. अभिनेते के. के. गोस्वामी हे टीव्ही जगतातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत. आजतागायत त्यांनी विविध हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषिक मालिकांमध्ये काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by K K Goswami (@yours_k_k_goswami)

गोस्वामी यांनी ‘शूssss कोई है’, ‘शक्तिमान’, ‘गुटुर गू’, ‘शका लका बूम बूम’, ‘ज्युनियर जी’, ‘सीआयडी’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Tags: Fire IncidentInstagram PostTV Actorviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group