हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार महेश बाबूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माहितीनूसार, त्याचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचे शनिवारी निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हैद्राबादच्या रुग्णालयात रमेश यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान रमेश बाबू गेल्या अनेक दिवसांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५६ वर्षांचे होते. महत्वाचे असे की अगदी २ दिवसांपूर्वीच महेश कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे तो भावाला भेटू शकला नाही. अखेर त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून आपले दुःख व्यक्त केले आहे.
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) January 9, 2022
दिवंगत रमेश बाबू गेल्या अनेक दिवसांपासून यकृत संबंधीत आजाराशी लढत होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने तात्काळ हैद्राबादच्या गचीबोलवी येथील एआयजी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच रमेश बाबू यांनी प्राण सोडले होते. हे समजताच कोरोनाशी झुंज देणारा महेश कोलमडून गेला आहे. याचे कारण महेश बाबू आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह असल्याने दोघांना रमेश बाबूंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येणार नाही हे साहजिक होत. त्यामुळे दुःख आणि शोक दोघांचीही मात्रा दुपटीने वाढल्याची भावना महेशला जाणवली. यानंतर त्याने ट्विट करून आपल्या भावाला श्रद्धांजली देत शोक व्यक्त केला आहे.
मोठ्या भावाच्या निधनानंतर महेश बाबूने ट्विट करत भावूक पोस्ट शेअर केली आहे. शोक व्यक्त करताना लिहिलेल्या पोस्टमध्ये महेशने लिहिले की, ‘रमेश बाबू तू नेहमीच माझी प्रेरणा होतास, तू माझी ताकद होतास, तू नेहमीच माझे धैर्य होतास, माझे सर्वस्व होतास. तू नसतास तर आज मी जितका आहे त्याच्या अर्धा देखील नसतो. तू माझ्यासाठी जे काही केले आहेस त्यासाठी तुझे खूप खूप आभार’.
महेश बाबू याचा मोठा भाऊ रमेश बाबू यांनीदेखील साऊथ इंडियन सिनेमात मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळे संपूर्ण टॉलिवूडमध्ये रमेश बाबू यांच्या जाण्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. रमेश बाबू यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
Discussion about this post