Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कठीण असतं एका कलाकाराबरोबर संसार करणं…’ म्हणत मिलिंद गवळींनी मानले पत्नीचे आभार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 27, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
421
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ यानकारात्मक पात्र साकारुनही अभिनेते मिलिंद गवळी प्रेक्षकांचे लाडके आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मिलिंद गवळी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी आजतागायत चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून मनोरंजन केले आहे. मिलिंद सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि नेहमीच व्यक्त होताना दिसतात. आजही ते व्यक्त झाले आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नीसाठी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी यांनी पत्नीसोबतच्या फोटोंचा एक कोलाज व्हिडिओ शेयर करत लिहिलंय की, ‘दिपा आणि माझा आज लग्नाच्या वाढदिवस. तीन दशकाहून अधिक काळ अशा माणसाबरोबर संसार केला जो गावोगावी जाऊन डोंबाऱ्याच्या खेळासारखा सिनेमा, सिरीयलचा खेळ करतो आहे. आणि बऱ्याच वेळेला महिने महिने काम करून सुद्धा घरी येताना संसार चालवण्यासाठी काहीच पैसे घरी घेऊन आलेलो नसायचो, बरेचसे प्रोड्युसर मला माझे ठरलेले पैसे सुद्धा द्यायचे नाहीत आणि आपल्या हक्काचे पैसे मागायची आजही मला सवय नाही आहे. हा संसाराचा गाडा कसा पुढे ढकला असेल, हे खरतर दिपालाच ठाऊक. पण कधी एका शब्दांनी विचारलं नाही , कधी कुरकुर केले नाही, का कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही, ऊलट काटकसर करायची सवय च लाऊन घेतली, इतकी सवय लागली की आजही पार्टी करायची म्हटली तरी सुद्धा एखादी भेळ, किंवा पाणीपुरी खाल्ली ही समाधान मानते ती’.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

‘अगदीच आजही कधी तरी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आम्ही जेवलोच तरी एखादं दहा-पंधरा रुपयाचं चोकोबार आईस्क्रीम खाल्लं की मगच चैन वगरे केल्यासारखं वाटतं तिला. आहे त्या परिस्थितीत खूप समाधानी राहायचं हे तिच्याकडून शिकण्यासारखा आहे. कठीण असतंय एका कलाकाराबरोबर संसार करणं, आणि तो कलाकार जर यशस्वी नसेल तर, संसाराचा गाडा पुढे ढकलत राहणार फारच कठीण होत जातं… काम नसायचं त्यावेळेला लोकं मुद्दामून अडूनाडून विचारायची की “काय मग आता घरीच आहेस का ?”, “शूटिंग वगैरे नाही का?” पण त्या काळातही दिपाने मला कधीही जाणव करून दिलं नाही, की मी एक flop Actor आहे , का माझ्याकडे काही काम नाही आहे किंवा मला कोणीही काम देत नाही आहे’.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

‘बरं मला माझ्या आई-वडिलांनी राजेशाही पद्धतीने वाढवलं असल्यामुळे, स्वतः जाऊन काम मागायची मला सवयच नव्हती, त्यामुळे महिने महिने काहीही काम मिळायचं नाही, सातारा कोल्हापूरचे पिक्चर यायचे त्यात पैसे अगदीच कमी मिळायचे. या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये घर सांभाळायचं, नातेवाईक सांभाळायचे, मिथीलाची तर संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी फक्त दिपा नेच घेतली होती, positive विचार आणि परमेश्वरावर अपार श्रद्धा . आमच्या लग्नाचा वाढदिवस आला की मला जाणवतं की इतकी वर्ष या माऊलीने माझ्या बरोबर किती आनंदाने हा संसार केला, खूप खडतर प्रवास केला आणि आजही करते आहे , तिचे जितके आभार मानू इतके कमी आहेत. दिपा तुला ही आपल्या ३३ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!’

Tags: Anniversary specialFamous Marathi ActorInstagram PostMilind GawaliViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group