हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूस जगतातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. याकरिता उपचारार्थ त्यांना मुंबईतील खार येथे पी डी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आता त्यांनी निमोनियावर मात केली आहे आणि बुधवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचा मुलगा विवान याने सोशल मीडियावर त्यांचा घरातला फोटो पोस्ट केला. ‘घरी परतले’ असं कॅप्शन देत विवानने नसीरुद्दीन शाह आणि आई रत्ना पाठक शाह यांचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला.
ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना गेल्या मंगळवारी (२९ जून २०२१) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या मॅनेजरने या वृत्ताला दुजोरा देत माध्यमांना सांगितले होते कि, ‘नसीरुद्दीन शाह हे गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांना न्युमोनिया झाला असून त्यावरील उपचार सुरू आहेत. तपासणीत फुफ्फुसांमध्ये पॅच आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणं आवश्यक होतं. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत’. यानंतर आता नासिरुद्दीन शशी घरी परतले असून त्यांच्या प्रकृतीतील सुधारणा पाहून चाहते अत्यंत आनंदी झाले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी सर्व सिनेइंडस्ट्रीमध्ये ओळखले जातात. त्यांना पद्मश्री आणि पद्मभुषण अशा दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते २०२० सालामध्ये ‘बंदिश बँडिट्स’ या वेब सीरिजमध्ये झळकले होते. त्यानंतर या वर्षात त्यांचा ‘रामप्रसाद की तेरवी’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. नासिरुद्दीन सध्या ७० वर्षीय आहेत. मात्र त्यांची काम करण्याची ताकद आजही कायम आहे. नसीरुद्दीन यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. बॉलिवूड जगतात त्यांचे अनोखे स्थान असून ते अत्यंत लोकप्रिय नायकांपैकी एक आहेत.
Discussion about this post