हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय चित्रपटसृष्टीत नायकाखेरीच खलनायकाची एक वेगळीच प्रतिमा असते. कारण ज्या चित्रपटात खलनायक नाही असा चित्रपटचं नाही. चित्रपटाच्या कथानकाचा खरा मसालाच खलनायकामुळे असतो. त्यामुळे खलनायक तर हवाच. मित्रांनो तुमचाही आवडता खलनायक असेलच ना. क्राईम मास्टर गोगो..? जग्गा..? शाकाल..? गब्बर सिंग…? का मग जयकांत शिक्रे….?
तुमच्यापैकी किमान १०० मधील ९५ लोकांचं उत्तर जयकांत शिक्रे असेल याची खात्री आहे आम्हाला. याच कारण म्हणजे, हि भूमिका साकारणारा अभिनेता कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यासाठी अग्रेसर असतो. या अभिनेत्याचे नाव आहे प्रकाश राज आणि आज त्यांचा ५७ वा वाढदिवस आहे.
View this post on Instagram
अभिनेते प्रकाश राज यांना विशेष अशा कोणत्याही ओळखीची गरज नाही. कारण प्रकाश राज हे निःसंशयपणे बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत पाहिले जातात. परंतु दक्षिण चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक एकापेक्षा एक असे अव्वल चित्रपट दिले आहेत. ज्यातील त्यांच्या प्रत्येक भूमिकेचे लोक चाहते आहेत. त्यामुळे प्रकाश राज यांचा चाहता वर्ग काही औरच आहे. आज त्यांचा ५७ वा वाढदिवस म्हणून जगभरातून सोशल मीडियावर नुसत्या शुभेच्छांचा पाऊस पडतोय. तर मग आपणही देऊया भरभरून शुभेच्छा आणि जाणून घेऊया त्यांच्याविषयी खास गोष्टी.
प्रकाश राज यांचे मूळ नाव प्रकाश राय आहे. त्यांचा जन्म २६ मार्च १९६५ रोजी बंगळूर येथील मैसुर मध्ये झाला. प्रकाश हे एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि राजकारणी आहेत. त्यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये अव्वल कामगिरी बजावली आहे.
आतापर्यंत त्यांना ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ८ नंदी पुरस्कार, ८ तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, ४ SIIMA पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तर ३ CineMAA पुरस्कार आणि ३ विजय पुरस्कारदेखील त्यांच्या नावे आहेत.
आज कितीही यशस्वी दिसत असले तरी सुरूवातीचा काळ मात्र प्रकाश यांचाही फार खडतर होता. एकेकाळी थिएटरमध्ये काम करायचे ३०० रूपये महिना पगारावर त्यांनी दिवस काढले आहेत. शिवाय त्यांनी पथनाट्यदेखील केले आहेत. पुढे हळूहळू परिस्थिती बदलली आणि प्रकाश यांना सिनेसृष्टीत काम मिळालं. यानंतर मालिकांमधल्या त्यांच्या कामाची दखल घेत त्यांचा ‘सुपर व्हिलन प्रकाश राज’ असा प्रवास सुरु झाला. ज्या थिएटरमध्ये त्यांनी ३०० रूपये पगारावर काम केले त्याच थिएटरमध्ये त्यांचे सिनेमे हाऊसफुल होऊ लागले.
https://www.instagram.com/p/CbjqJVtlN1n/?utm_source=ig_web_copy_link
प्रकाश राज यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण त्यांचं नाव घेता डोळ्यासमोर उभा राहतो सिंघममधला जयकांत शिक्रे… कारण या सिनेमातील नायकाइतकेच खलनायकाच्याही लोक प्रेमात पडले होते.
शिवाय हिरोपंती, जंजीर, मुंबई मिरर, दबंग 2, वॉन्टेड, पुलिसगिरी, गोलमाल अगेन या सिनेमात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. अभिनयासोबतच ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेदेखील सतत चर्चेत राहिले आहेत. याशिवाय प्रकाश राज हे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलदेखील फार चर्चेत राहिले आहेत.
प्रकाश राज यांचा जन्म बेंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पण त्यांची स्वतःच्या हिंमतीवर स्वतःला ब्रँड बनविले आहे. दरम्यान १९९४ सालामध्ये त्यांनी ललिता यांच्याशी लग्न केलं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. ललिताला घटस्फोट दिल्यानंतर प्रकाश यांनी त्यांच्यापेक्षा वयाने १२ वर्षांनी लहान असलेल्या कोरिओग्राफरशी लग्न केलं.
पोनी वर्मा असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. प्रकाश यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. दुसरं लग्न करण्यापूर्वी त्यांनी या दोन्ही मुलींची परवानगी घेतली होती. आज ते सुखी संसाराचा उपभोग घेत आहेत.
Discussion about this post