हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, मालिका, गायन अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य करणारे अभिनेते प्रशांत दामले सोशल मीडियावर नेहमीच विविध पोस्ट शेअर करत असतात. कधी कलावंतांचे प्रश्न मांडण्यासाठी तर कधी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. सध्या प्रशांत दामले हे ‘नियम व अटी लागू’ नाटक रंगमंचावर साकारताना दिसत आहे. नुकतंच यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचा संध्या राज्यभरात बोलबाला आहे. या नाटकाचे लेखन अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने केले असून याचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे.
तर नाटकात मुख्य भूमिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे आहेत. या नाटकाचे सध्या इचलकरंजीमध्ये प्रयोग सुरु आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांनी हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांची शिस्तबद्ध गर्दी त्यांनी दाखवून दिली आहे.
या पोस्टमध्ये प्रशांत दामले यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काही प्रेक्षक मंडळी नाटकाची तिकीट खरेदी करताना दिसत आहेत. या फोटोसोबत कॅप्शन देताना प्रशांत दामले यांनी लिहिले आहे कि, ‘कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… आणि ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची… ही आहे शिस्तप्रिय ईचलकरंजीकरांनी लावलेली रांग – महाराष्ट्रभर तुफान चाललेल्या ‘नियम व अटी लागू’ या खुसखूशीत नाटकाच्या तिकिट बुकिंगसाठी…’.
Discussion about this post