हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल हॅकिंगचे प्रकार सर्रास वाढले आहेत. जितकं जग सोशलाईज होत आहे, प्रगती करत आहे तितकंच जग कठीण आणि भयंकर होत आहे याचा प्रत्यय म्हणजे हॅकिंग. दररोज दिवसाला कित्येकांचे सोशल मीडिया हॅण्डल, वैयक्तिक कागदपत्रे, दस्तावेज, बँक अकाउंट हॅक होण्याचे प्रकार घडत असतात. सोशल मीडिया हॅकर्सचा वाढलेला सुळसुळाट थांबविण्यासाठी सायबर सेल नेहमीच कार्यरत आहे. मात्र चोरांचे हात प्रमाणापेक्षा जास्तच वाढत चालले आहेत. याचा प्रत्यय नुकताच मराठी सिनेसृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि या अभिनेते प्रवीण तरडे यांना आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रवीण तरडे यांच्या फेसबूक अकाऊंट वरून अनेकांना चुकीचे मेसेज जात होते. अखेर हे अकाऊंट हॅक झाले असल्याचे त्यांनी एका इंस्टा पोस्टच्या माध्यमातून जाहीर केले आहे. सोशल मीडिया संपर्काचं सर्वात महत्वाचं साधन असलं तरी तंत्रज्ञान प्रगत की कुठे ना कुठे फटका बसतोच. सध्या सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे त्यांनाही अकाऊंट हॅक होण्याचा सामना करावा लागतो. प्रविण तरडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याबद्दल त्यांनी इंस्टावर माहिती दिली आहे. ‘माझ्या फेबसबुकवरून काहीही मेसेज आला तरी रिप्लाय करू नका’ असं आवाहन त्यांनी केलंय.
प्रवीण तरडे यांच्या फेसबूक अकाउंटवरून अनेकांना खोट्या लिंक्स पाठविल्या जात आहेत. तसेच फोन नंबरची मागणी केली जातेय. इतकेच नव्हे तर काही मेसेज देखील जात आहेत. त्यामुळे आपल्या चाहत्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तरडेंनी इंस्टावर पोस्ट केली आहे. यात ते म्हणाले कि, ‘नमस्कार, मी प्रविण विठ्ठल तरडे. माझे फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. तिथून अनेक जणांना खोट्य लिंक्स, फोन नंबरची मागणी इ. मेसेज जात आहेत. कोणीही रिप्लाय देऊ नये. धन्यवाद’. त्याचप्रमाणे चाहत्यांची माफी मागत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘इन्स्टाग्राम चालू आहे फेसबुक हॅक झालंय. कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. माझं इंस्टाग्राम फेसबुक लिंक असल्यामुळे हा मेसेज सुध्दा फेसबुकला दिसू शकतो. तसदी बद्दल क्षमस्व’.’ याआधी संतोष जुवेकर, हेमंत ढोमे, शुभांगी गोखले यांचही फेसबुक हॅक झालं होतं.
Discussion about this post