Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता रणवीर सिंग ठरला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’; बिग बींना पुरस्कार समर्पित करीत म्हणाला,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 12, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
RanVeer_BigB_
0
SHARES
114
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध माध्यमांतर्फे विविध श्रेणीतील सन्माननीय व्यक्तींसाठी विविध पुरस्कारांची घोषणा केली जाते. यानुसार एका माध्यम समूहातर्फे मुंबईत अशाच एका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याला ‘८३’ या चित्रपटासाठी ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार अभिनेता रणवीर सिंग याला प्रदान करण्यात आला. यानंतर रणवीरने एक छोटंसं भाषण करत हा पुरस्कार बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांना समर्पित करत असल्याचे म्हणत सगळ्यांची मन जिंकली आहेत.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

अभिनेता रणवीर सिंग याने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर आपल्याला मिळालेल्या पुस्काराची माहिती दिली आहे. हि पोस्ट शेअर करताना त्याने आपला आनंददेखील व्यक्त केला आहे. या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर! महाराष्ट्र माझे घर, माझा अभिमान! भारतातील दिग्गज नेते श्री एकनाथ शिंदे जी, श्री देवेंद्र फडणवीस जी आणि श्री प्रमोद सावंत जी यांच्याकडून हा प्रतिष्ठित सन्मान मिळाल्याबद्दल विनम्र आहे. या सन्मानाबद्दल धन्यवाद!’ रणवीरच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनपर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

सोशल मिडीयावर या पुरस्कार सोहळ्याचे काही व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. यातील एकामध्ये तो स्टेजवर पळत जातो आणि बड्या दिग्गजांच्या मध्ये उभ्या असलेल्या अभिनेते नाना पाटेकर यांची गळाभेट घेऊन त्यांच्या गालावर किस करतो. यानंतर आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख करत हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना समर्पित करत असल्याचे तो सांगतो. याव्यतिरिक्त रणवीरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो त्याचा अत्यंत गाजलेला सिनेमा बाजीराव-मस्तानी मधील मल्हारी हे गाणं गाताना दिसत आहे.

@RanveerOfficial Ranvir singh magnificent performance at lokmat maharashtrian of the year award #lokmatmaharashtrianoftheyear #RanveerSingh #lokmat #lokmatmoststylish pic.twitter.com/RBnmJaOUBz

— Preeti Sompura (@sompura_preeti) October 11, 2022

रणवीरच्या वर्क फ्रण्टबद्दल सांगायचं झालं तर, तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे स्क्रीन शेअर करत आहेत. याशिवाय करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातही तो दिसणार आहे. यात त्याच्यासोबत आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

Tags: Famous Bollywood ActorInstagram Postranveer singhTweeter Postviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group