हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. अर्थात आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रितेशचीदेखील हजेरी लागणार आहे. ओटीटीवर काम करण्यासाठी रितेश अतिशय उत्सुक झाला आहे, असे त्याने स्वतःच एक पोस्ट करीत सांगितले आहे. ‘फ्रेडी’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटांचा दिग्दर्शक शशांक घोष दिग्दर्शित ‘प्लॅन ए प्लॅन बी’ या कॉमेडीय चित्रपटात रितेश दिसणार आहे. या चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक नुकताच लॉंच करण्यात आला आहे.
रितेश देशमुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्यामुळे त्याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर स्वतःच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे आणि त्याचसोबत कॅप्शनही लिहिले आहे. ज्यातून त्याने ओटीटीवर डेब्यू करीत असल्याची माहिती आणि उत्सुकता चाहत्यांसह शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो मुंबईतल्या एका कुटूंब न्यायालयाच्या आवारात उभा असल्याचे दिसत आहे. तसेच नुकतेच घटस्फोटीत आणि सुखी असे लिहिलेली एक पाटी त्याने हातात पकडलेली दिसत आहे. याशिवाय त्याने शेअर केलेल्या आणखी एका फोटोत अभिनेत्री तमन्ना भाटिया दिसतेय. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षक फार उत्सुक आहेत.
आगामी चित्रपट ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून याची कथा एका मॅचमेकर आणि घटस्फोटीत वकीलावर आधारलेली आहे. यात त्याचे स्वतःचे एक गुपित आहे. मॅचमेकरला वाटते की त्याच्याशिवाय प्रत्येकाने लग्न केले पाहिजे. पण जेव्हा मॅचमेकर आणि घटस्फोटीत वकील हे दोघे एकमेकांना भेटतात तेव्हा मात्र काही भलतंच घडत. या चित्रपटात अशीच काही मजेशीर कहाणी घडणार असल्याचे दिसणार आहे. ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई’, ‘डर्टी पिक्चर’, ‘किक’ आणि ‘गब्बर इज बॅक’ यासारखे चित्रपटांचे लेखन करणारे रजत अरोरा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
रितेश देशमुख, तमन्ना भाटिया, पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला अशी स्टार कास्ट या चित्रपटात दिसेल. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून याबाबत बोलताना दिग्दर्शक शशांक घोष म्हणाले, नेटफ्लिक्ससह प्लॅन ए प्लॅन बीची घोषणा करताना मी खूप उत्साहित आहे. ही एक अनोखी कथा आहे. यात असामान्य पात्र एकमेकांच्या विरोधात असतील. यासोबतच प्रेमाला नव्या रूपात सादर करणार आहेत. नेटफ्लिक्सवर जगभरातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवण्याचा मला पूर्णपणे आनंद झाला आहे आणि मला खात्री आहे की लोकांना ते आवडेल.
Discussion about this post