हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | ओम राऊतच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात सुपरस्टार प्रभास रामाच्या भूमिकेत दिसणार असून सैफ अली खान पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेलं नाही, परंतु आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सैफ पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
ओम राऊत रामायणाच्या गोष्टीवर आधारित आदिपुरुष चित्रपटासाठी मोठा खर्च करीत आहेत. या चित्रपटात भगवान रामाची भूमिका बाहुबली स्टार प्रभास, सीतेच्या भूमिकेत कृती सैनन आणि रावणाच्या रोलमध्ये सैल अली खान दिसणार आहे. चित्रपटासंदर्भात सैफ अली खानने केलेल्या एका वक्तव्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि सोशल मीडियावर #BoycottAdipurush ट्रेंड केला जात आहे.
काय म्हणाला सैफ?
अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने ‘आदिपुरुष’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हटले की, या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. तो म्हणाला, ‘ एक अशा राक्षस राजाची भूमिका वठवणं रंजक आहे. यामध्ये सीताचं अपहरणाच्या औचित्यातून रावणाची रामासोबत लढाई सूड उगविण्यात दाखवली जाईल, जी लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचं नाक कापल्यामुळे सुरू झाली होती
सैफच्या वक्तव्यावर भडकले लोक
मुलाखतीतील सैफच्या वक्तव्यामुळे लोक भडकले आहे. रावणाने सीतेचं केलेल्या अपहरणाचं समर्थन कसं केलं जाऊ शकतं, असा सवाल उपस्थित करीत आहे. यानंतर #BoycottAdipurush आणि #WakeUpOmRaut ट्विट करीत चित्रपटावर बहिष्कार घालत आहेत. अनेकांनी सैफ अली खानला चित्रपटातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. अद्याप चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झालेलं नाही, मात्र 11 ऑगस्ट 2022 रोजी हा चित्रपट रिलीज करण्याची योजना आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’