Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Salman Khan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान याना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मॉर्निंग वॉकला गेले असताना सलमानचे वडील सलीम खान यांना बेंचवर एक पत्र सापडलं. ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर अभिनेता सलमान खानने स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना अर्ज केला होता. या अर्जावर विचार करून आता मुंबई पोलिसांनी त्याला परवाना जारी केला आहे.

अभिनेता सलमान खान को मिला बंदूक रखने का लाइसेंस, धमकी मिलने के बाद दिया था आवेदन!
.
.
.#newsnut #newsnutindia #bollywood #bollywoodactor #salmankhan #beingsalmankhan #latestnews @BeingSalmanKhan pic.twitter.com/DO7gJC7aEp

— NEWSNUT (@NEWSNUTOFFICIAL) August 1, 2022

मुंबई पोलीसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले कि, ‘अभिनेता सलमान खानने काही दिवसांपूर्वी स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्याने २२ जुलै २०२२ रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेतली होती.’ पुढे सांगताना नाव न सांगण्याच्या अटीवर आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सलमान खानच्या प्रतिनिधीने पोलिस मुख्यालयाशी संबंधित शाखेतून परवाना घेतला आहे. पावती घेतल्यानंतर त्याच्याकडे परवाना देण्यात आला आहे. आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच आम्ही अभिनेत्याला शस्त्र परवाना जारी केला आहे’.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

याशिवाय आणखी माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘पुढील प्रक्रियेनुसार केस पडताळणीसाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे (झोन ९) संबंधित कागदपत्रे पाठविण्यात आली होती. अभिनेत्याचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का याचीही पाहणी करण्यात आली. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याची सुरक्षा ६ जूनपर्यंत वाढवली होती. मॉर्निंग वॉक करताना सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळालं आणि हे पत्र मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवली.

Tags: death threatInstagram Postmumbai policeSalman Khantweeter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group