हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून राज्यातील राजकारण एका वेगळ्याच स्तरावर जाऊन पोहोचल्याचे दिसत आहे. छोट्या छोट्या बारकाईने खेळले जाणारे डावपेच, शह आणि मात, सत्ताधिकार अशा विविध मुद्द्यांवर खुर्ची बहाद्दर लक्ष केंद्रित करून बसले आहेत. यामुळे राज्यात राजकीय घडामोडींनी तुफान वेग धारण केला आहे. पहाटेचा शपथविधी, पक्षातील बंडखोरी आणि अचानक झालेला सत्ताबदल यावर विविध स्तरांतून भाष्य केले जात असताना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. यावर गेल्या ३ दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. याची पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेता संदीप पाठकने केलेले एक ट्विट प्रचंड चर्चेत आले आहे.
मा. बाळासाहेब ठाकरें ची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल.
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय… @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @INCIndia @AAPMumbai— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) February 24, 2023
राज्यात तापलेले राजकीय वातावरण पाहता अशावेळी कोण कधी काय बोलेल.? करेल..? व्यक्त होईल..? यावर प्रत्येकाचं बारीक लक्ष आहे. अशातच मराठी अभिनेता संदीप पाठक याने आपल्या शैलीत चालू राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं एक ट्वीट शेअर केलं आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या ट्विटमध्ये संदीपने लिहिले आहे कि, ‘मा.बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की, “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे… मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल…?? जरा कठीण वाटतंय…’. संदीपने शेअर केलेले हे ट्वीट राज्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, आप, राष्ट्रवादी अशा सर्वच राजकीय पक्षांना टॅग केले आहे.
मराठी अभिनेता संदीप पाठक अनेकदा राजकीय मुद्दे, परिस्थिती वा अन्य गंभीर विषयांवर परखड मत मांडताना दिसतो. विविध विषयांवर भाष्य करत अनेक प्रश्न उठविताना दिसतो. त्यामुळे संदिपने शेअर केलेलं हे ट्वीटदेखील सध्या प्रचंड चर्चेत आले असून यावर अनेक नेटकऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मी राजसमर्थक आहे कट्टर पण सध्याच्या घडीला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे दोनच व्यक्ती दिसतात.
— किरण रेवाळे (@rewalek) February 24, 2023
अनेकांनी आपापल्या कमेंटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. तर काहींनी खासदार सुप्रिया सुळेदेखील पंतप्रधान होऊ शकतात असे मत प्रकट केले आहे.
Discussion about this post