हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिने इंडस्ट्रीमध्ये सामाजिक भान जपून वावरणारे कलाकार फार कमी उरले आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या भावना आणि संवेदना कायम जागरूक असायला हव्यात. त्या मोजण्याइतपत उरलेल्या कलाकारांमध्ये अभिनेता संतोष जुवेकर याच नाव येत. कारण महामारी असो किंवा अन्य कोणती सामाजिक समस्या जिथे मदत करता येईल तिथे सढळहस्ते मदत करणे हा संतोषचा जणू स्वभावच. सध्या त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना एक भावनिक आवाहन केलं आहे. दत्तक पालक व्हा! असे या पोस्टचे टायटल आहे. सध्या संतोषची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय आणि चर्चेतही आहे.
आपल्या भल्या मोठ्या समाजात अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्या खाण्यापिण्यापासून ते शिक्षणापर्यंत अनेक गरजा भागवायला त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. अशा मुलांसाठी अनेक सामाजिक संस्था अविरत काम करीत आहेत. अभिनेता संतोष जुवेकरने अशाच मुलांसाठी आपणही काहीतरी करूया अशा भावनेने हि पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय कि, ‘घरच्यांबरोबर मित्र मैत्रिणींबरोबर बाहेर कधी नुसतं जेवायला गेलो तरी ६- ७ हजार बिल सहज येत. मग जर फक्त १० हजारात आपण एखाद्या मुलाचं/मुलीचं वर्षाचं अन्न नक्कीच पुरवू शकतो. वर्षातन एखादी गोव्याची ट्रिप केली तरी २०- २५ हजार सहज खर्च होतात आपले. मग फक्त १५ हजारात एखाद्या मुलाचा/मुलीचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च नक्कीच करून त्या मुलाचे/ मुलीचे दत्तक पालकत्व स्वीकारू शकतो आपण. आणि हे सगळं ज्यांना मनापासून करावंसं वाटतं आणि जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी नक्कीच कराव पण मदत म्हणुन नाही तर कर्तव्य म्हणुन. आणि ही बळजबरी नाही.’ केवळ मदतीच्या भावनेने नव्हे तर कर्तव्याच्या भावनेने एक आर्थिक दृष्ट्या सबळ असणारा माणूस म्हणून आणि एक नागरिक म्हणून आपण कर्त्यव्यदक्ष असलं पाहिजे.
अभिनेता संतोष जुवेकर हा मराठी अभिनेता असून त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून अव्वल भूमिका साकारल्या आहेत. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असल्यामुळे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून तो अशा विविध पोस्ट करीत असतो. तूर्तास त्याच्या या पोस्टची तुफान चर्चा आहे. अनेक नेटकरी त्याच्या या पोस्टचे भरभरून कौतुक करीत आहेत. वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, संतोषची धारावी बँक ही वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याच्या एका चित्रपटाचं शूटिंग अलीकडेच संपल्याची त्याने पोस्ट शेअर केली होती.
Discussion about this post