हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी आज दिनांक ९ मार्च २०२३ रोजी सकाळी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर ट्विट शेअर करत हि दुःखद बातमी दिली. मात्र सतीश कौशिक यांनी बुधवारी रात्री ८ मार्च २०२३ रोजीच अखेरचा श्वास घेतला आहे. यानंतर आता सतीश यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
"Actor Satish Kaushik passes away," tweets Anupam Kher
Read @ANI Story | https://t.co/KkmyNu4D7L#SatishKaushik #AnupamKher #Bollywood pic.twitter.com/TpPhNcXSYV
— ANI Digital (@ani_digital) March 9, 2023
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सतीश कौशिक गुरुग्राम येथे एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते आणि इथेच त्यांची प्रकृती खालावली. दरम्यान गाडीत असतानाच त्यांना तीव्र हार्ट अटॅक आला. हा झटका इतका तीव्र होता कि सतीश यांना वाचवणे अवघड झाले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकूणच असे स्पष्ट होत आहे कि, सतीश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले जेव्हा ते दिल्ली, एनसीआरमध्ये होते. माहितीनुसार, त्यांचा मृतदेह गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह मुंबईला आणण्यात येणार आहे.
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
आतापर्यंत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते सतीश कौशिक यांना वयाच्या ६६ व्या वर्षी हार्ट अटॅक येण्याचे कारण लठ्ठपणा असू शकतो. कारण वाढतं वजन हृदयविकारासाठी मोठं कारण आहे. सतीश कौशिक यांना हार्ट अटॅक आल्यानंतर त्वरित गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र हार्ट अटॅकची तीव्रता प्रचंड असल्याने त्यांचं निधन झालं. दरम्यान, सतीश यांच्या पश्चात त्यांची पत्नी शशी कौशिक आणि त्यांची ११ वर्षांची मुलगी वंशिका असा परिवार आहे. वंशिकाचा जन्म २०१२ साली सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. याआधी त्यांना एक मुलगा होता. मात्र १९९६ मध्ये वयाच्या दुसऱ्याच वर्षी त्याचं निधन झालं.
Discussion about this post