हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ – आचार्य कालिदास पुरस्कार’ने गौरवण्यात आलं. हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. यावेळी पोंक्षेंसोबत अभिनेता स्वप्नील जोशीलादेखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आक्षेप घेत फेसबुक पोस्टमधून टीकास्त्र डागले. यानंतर ती पोस्ट डिलिटही केली. मात्र चर्चा कायम राहिली. महेश टिळेकर यांच्या फेसबूक पोस्टला अप्रत्यक्षपणे शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट करीत प्रत्युत्तर दिले आहे.
अभिनेता शरद पोंक्षे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये पोंक्षेंनी लिहिले आहे कि, ‘सातत्याने सावरकर आठवतात, १०० वर्षांपूर्वी ते म्हणाले होते की, मला मुसलमानांची, ख्रिश्चनांची भिती वाटत नाही, मला हिंदूंचीच भिती वाटते, कारण हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहतात. किती ओळखलं होतं त्यांनी आपल्या समाजाला. (ह्या पोस्टवर जी कूत्री भूंकतील त्यांना “हाड” असही म्हणणार नाही.)’ असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता कंसातील वाक्य वाचल्याक्षणी कुणाच्याही डोक्यात प्रकाश पडेल कि पोंक्षे यांनी या पोस्टमध्ये आपला संताप व्यक्त केला आहे.
महेश टिळेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते कि, ‘अभिनंदन पोंक्षे, जोशी. नुकत्याच एका संस्थेने जेष्ठ आणि विद्वान अभिनेते शरद पोंक्षे आणि बाल कलाकार ते हिरो असं प्रचंड यश मिळवणारा सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी यांना हिदुत्व आणि हिंदू धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव केला. यामुळे या कलाकारांचा अभिमान वाटून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा इतकं कोणतं महान कार्य या कलाकारांनी हिंदुत्वासाठी केलं आहे जे या आधी कुठल्याच कलाकारांना जमलं नाही. कलाकाराला त्याच्या अभिनयासाठी किंवा त्याने समाजासाठी काहीतरी योगदान दिलं म्हणून त्याचा सन्मान, गौरव होतो हे आत्तापर्यंत पाहण्यात आलं होतं. पण कलाकाराला धर्मासाठी म्हणून पुरस्कार देण्यात येतोय हे मी पहिल्यांदाच पाहतोय.’
Discussion about this post