हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वासाठी शशांक केतकर हे नाव काही नवे नाही. मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमातून शशांक केतकर आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शशांक सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो आणि म्हणूनच तो अनेकदा व्हिडीओ, फोटो शेअर करत आपल्या आयुष्यातील लहान सहान गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. ज्या वाड्यात शशांक केतकरचा जन्म झाला तो वडिलोपार्जित नेने वाडा आता पाडला जाणार आहे. याविषयी त्याने स्वतःच माहिती दिली आहे. वाड्याचे काही फोटो शेअर करत त्याने आठवणींना उजाळा दिला आहे.
या पोस्टमध्ये शशांकने वाड्याचे काही फोटो शेअर केला आहेत. सोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय कि, ‘सातारा. ज्या वाड्यात माझा जन्म झाला तो हा नेने वाडा. खूप आठवणी आहेत या वाड्यातल्या. काही महिन्यात आता हा पाडला जाईल आणि तिथे एका घराऐवजी, अनेक घरांची सात आठ मजली ईमारत उभी राहील. आता हा वाडा फक्त काही फोटोस आणि आठवणीतच शिल्लक राहील’. शशांकने दिलेल्या माहितीनुसार, हा वाडा साताऱ्यातील नेने चौक येथे स्थित आहे. हा वाडा पाडून इथे इमारत बांधली जाणार असल्याचे शशांकने सांगितले आहे. याच वाड्यात त्याचा जन्म झाल्यामुळे अनेक आठवणींचा साठा त्याच्याकडे आहे.
दरम्यान, शशांकने शेअर केलेली हि वाड्याची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. वाड्याच्या जागी इमारत होणार हे वाचून अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर कमेंट करत एका युजरने म्हटले आहे कि, वाडा सुस्थितीत दिसतोय अजून… राखायला पाहिजे…’ तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘शशांक.. हा वाडा तू राखायला हवा’.
तसेच अन्य एकाने म्हटले आहे कि, ‘या वाड्यात माझ्यासारख्या अनेकांवर लहानपणी संस्कार झाले आहेत. नेने आजींकडे गीतापठण आणि मग लीमलेटची गोळी आणि आजोबांचा धाक, आदरयुक्त भिती.. अशा अनेक आठवणीदेखील जोडल्या गेलेल्या आहेत या वाड्याशी..’. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटले कि, ‘खूप छान ! पण तोडण्यापेक्षा रिनोवेट करुन हेरिटेज म्हणून एखादा मराठमोळा कॅफे वगैरे करता येईल का?? नक्कीच तूम्ही काहीतरी वेगळा विचार करू शकता’.
Discussion about this post