हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोनामुळे राज्यातील चित्रीकरण पूर्णपणे बंद होते. त्यामुळे अनेको कलाकार घरीच होते. मात्र यानंतर आता कुठे ओटीटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा कलाकार मनोरंजन करण्यासाठी सरसावले आहेत. सध्या बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपट ‘शेरशहा’ बटालियनची कमान सांभाळायला आणि नेतृत्व करायला पूर्णपणे सज्ज असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस यायला सज्ज आहे. या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर येत्या २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. “ये दिल मांगे मोर” ही ललकारी देशाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा चांगलीच घुमणार आहे.
मुख्य म्हणजे या चित्रपटातील मुख्य नायकाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा करणार आहे. शेरशहाचे नवे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. शेरशहा या चित्रपटाचे कथानक शौर्य, प्रेम आणि त्याग यावर आधारलेले असणार आहे.
कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनपटावर प्रेरित असणारा शेरशहा या चित्रपटाची निर्मिती प्रेक्षकांना त्याग आणि बलिदानाचे महत्व पटवून देणारा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कॅप्टन बत्रा यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली आहे. तर १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी या चित्रपटाचे कथानक पूर्णरुपी आहे.
विष्णू वर्धन यांचे दिग्दर्शन आणि धर्मा प्रोडक्शन्स व काश एंटरटेनेमेंट यांच्या संयुक्त निर्मितीत असलेला ‘शेरशाह’ हा बॉलीवूड इंडस्ट्रीचा या वर्षातील सर्वात मोठा युद्ध नाट्य चित्रपट असणार आहे. इतकेच नव्हे तर, हा रोमांचक चित्रपट येत्या १२ ऑगस्ट २०२१ ला अमेझॉन प्राईम व्हिडीओ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असतील. तर शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा यांच्याही अन्य महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.
Discussion about this post