हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर अपील करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. आता तो बस्तर भागातील माओवाद्यांनी गंभीरपणे प्रभावित झालेल्या बिजापूर जिल्ह्यातील आदिवासी मुलीला मदत करण्यासाठी पुढे आला आहे. बस्तर विभागात गेल्या पाच दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे या मुलीचे घर आणि पुस्तके हरवली आहेत.
सोनू सूद यांनी आदिवासी मुलगी अंजली कुडीयम हीचा व्हिडिओ शेअर करताना ट्विटरवर लिहिले आहे – ‘अश्रू पूस बहिणी… , पुस्तके नवीन असतील आणि घरही नवीन असेल. स्थानिक पत्रकार मुकेश चंद्रकर यांनी प्रथम हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये मुलगी रडताना दिसत आहे कारण सततच्या पावसामुळे तिचे घर आणि पुस्तके खराब झाली आहेत.
आंसू पोंछ ले बहन…
किताबें भी नयीं होंगी..
घर भी नया होगा। https://t.co/crLh48yCLr— sonu sood (@SonuSood) August 19, 2020
मुलीचे वडील एक शेतकरी असून त्यांच्याकडे 5 एकर जमीनही आहे पण पावसामुळे पीक खराब झाले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल देखील या मुलीच्या मदतीसाठी पुढे आले असून अधिकाऱ्यांना त्यांनी या मुलीला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी रितेश अग्रवाल आणि स्थानिक आमदार विक्रम मांडवी यांनी घर बांधण्यासाठी अंजलीला 1.1 लाख रुपयांचा धनादेश दिला.