हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | लॉकडाउन मध्ये गरीब मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या अभिनेता सोनू सूदला ग्रामोदय चेंबर ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजीने (जीसीओटी) बंधु मित्र पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं आहे. जीसीओटीच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोनू सूदचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषदेचे अध्यक्ष गुथा सुखेन्द्र रेड्डी यांनी केलं.
१५०व्या गांधी जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात सोनू सूदने अनेक गरीबांची मदत केली. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे प्रचंड नुकसान झाले.
अशा संकट समयी अनेक कलाकार, सामाजिक संस्थांनी त्यांच्या मदतीसाठी एक हात पुढे केला. हाती काम नसल्यामुळे या मजुरांनी आपल्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतल. सुरवातीला हे मजूर कामगार पायी, सायकलीवर आपल्या गावी पोहोचले. या दरम्यान अनेक मजुरांचा मृत्यू देखील झाला.
यावेळी सोनू सूदने शक्ती अन्नदानमसोबत कायम काम करण्याचं अश्वासन जीसीओटीला दिलं. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू श्रमिकांसाठी मात्र हिरो ठरला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’