हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | कोरोना काळात जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले तेव्हा देशातील मजुरांसाठी आणि कष्टकऱ्यांच्या साठी धावून आलेली व्यक्ती म्हणजे अभिनेता सोनू सूद…कोरोना काळात लोकांसाठी देवदूत ठरलेल्या सोनू सूदचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात आला असला तरी सोनूकडून लोकांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे. सोशल मीडियावर जे कुणी सोनूला मदत मागतात तो लगेच त्यांना मदतीची व्यवस्था करतो. सोनच्या या कामाने त्याची लोकप्रियता आणखी जास्त वाढली आहे. अशात अशी चर्चा सुरू आहे की, लवकरच सोनू सूदचा बायोपिक येऊ शकतो.
असं असलं तरी सोनू म्हणाला की, मला वाटतं की, माझ्यावर बायोपिक बनवला जाऊ नये. सोनू म्हणाला की, त्याच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची ही घाई होईल. तो म्हणाला की, त्याला आयुष्यात अजून खूप काही मिळवायचं आहे. त्याने हेही मान्य केलं की, काही निर्मात्यांनी त्याच्या बायोपिकसाठी संपर्क केला होता.
जेव्हा सोनूला विचारण्यात आले की, जर त्याचा बायोपिक बनला तर त्याची भूमिका कुणी साकारावी असं त्याला वाटतं? यावर सोनू म्हणाला की, त्याला स्वत:ला स्वत:ची भूमिका करणं आवडेल. तो म्हणाला की, त्याने स्वत: हा अधिकार कमावला आहे. तो हेही म्हणाला की, त्याचा बायोपिक बनलाच तर याच अटीवर बनेल की, तोच त्याची भूमिका साकारेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’