हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज जगभरात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जात आहे. मराठमोळा अभिनेता सुबोध भावे देखील पुस्तक दिन साजरा करतोय. इतकेच नव्हे तर त्याने हातात पुस्तक घेत एक फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करीत पुस्तक दिनाच्या शुभेछया दिल्या आहे. या फोटोत त्याचे पुस्तकांवर असणारे प्रेम अगदी उघड दिसत आहे. सुबोध एक उत्तम अभिनेता, लेखक आणि निर्माता तर आहेच. पण यासोबत तो वाचनवेडा देखील आहे. त्याने अभिनयाच्या प्रीतीसंगे वाचनाचे वेड देखील जोपासले आहे.
या फोटोत सुबोधच्या हातात कुमार गंधर्व लिखित ‘अनुपरागविलास: २’ हे पुस्तक दिसत आहे. या फोटो सोबत कॅप्शन म्हणून लिहिले आहे कि, ‘मनाची आणि बुद्धीची मशागत! जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व वाचनवेड्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!’. अगदी तासाभरातच ३ हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. तर अनेकांनी या फोटोवर कमेंट करीत त्यांच्या आयुष्यातील पुस्तकांचे महत्व सांगितले आहे. सोबतच वाचन आयुष्यात का गरजेचे आहे याबद्दलही काही जणांनी कमेंट केल्या आहेत.
‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर आधारित चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता सुबोध भावे ‘संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘मानापमान’ असून हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी संगीतमय चित्रपटाची मेजवानी येऊ घातली आहे हे नक्की.
Discussion about this post