हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार राजकारणात देखील आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. जसे कि. बॉलिवूड सिनेविश्वातून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, कमल हसन, जया बच्चन, हेमा मालिनी. तर मराठी सिनेविश्वातून अभिनेता सुशांत शेलार, अवधूत गुप्ते, दीपाली सय्यद, सुरेखा पुणेकर हे कलाकार विविध पक्षातून राजकीय क्षेत्रात किल्ला लढवताना दिसत आहेत. यातच आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. कॉमिक अभिनेता योगेश शिरसाट याने शिवसेनेत म्हजेच शिंदे गटात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्याच्यासोबत अन्य काही कलाकारांनीदेखील शिंदे गटात एंट्री केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून आपण कलाकार आणि राजकारण यांचा एक अनोखा मिलाप पाहत आलो आहोत. कला टिकवण्यासाठी सत्ता हवीच या हेतून अनेक कलाकार राजकारण्यांसोबत सलोख्याचे संबंध राखताना दिसतात. अशीच आवड आणि कला विश्वात हातचा राखण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता योगेश शिरसाट शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाला आहे.
यावेळी योगेशसोबत शर्मिष्ठा राऊत, राजेश भोसले, केतन क्षीरसागर, शेखर फडके आणि अलका परब यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी योगेश शिरसाटने शिंदे गटातच प्रवेश का..? याचे कारण सांगितले आहे. पक्षप्रवेश करतेवेळी योगेश म्हणाला कि, ‘आमच्या क्षेत्रातही कष्टकरी आहेत, अनेक कलाकार असे आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. या कलाकारांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत.
सिनेसृष्टीत धडपड करणाऱ्या कलाकारांचा आवाज आमच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. कलावंतांचे प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही सर्व कलाकार अभिनेता सुशांत शेलार यांच्या नेतृत्वात एकत्र आलो आणि आज या पक्षप्रवेशासह एक मोठी जबाबदारी घेत आहोत. मनोरंजन विश्वात धडपड करणाऱ्या कलावंतांच्या राहण्याचा प्रश्न, तसेच इतर काही प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यावर काही उपाय काढण्याची विनंती आम्ही करणार आहोत.
Discussion about this post