Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अंकुशच्या पत्नीचं मराठी मालिकेत पुनरागमन; अभिनेत्री म्हणून पुन्हा इंडस्ट्री गाजवणार 

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 13, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Deepaa Parab Choudhari
0
SHARES
14
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी नेहमी चर्चेत असतोच. पण यावेळी चर्चा आहे ती त्याच्या बायकोची. अर्थात अभिनेत्री दीपा परबची. खूप मोठा ब्रेकनंतर आता दीपा पुन्हा एकदा इंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. याआधी तिने विविध मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. तिची दामिनी हि मालिका तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात असेलच. यानंतर आता पुन्हा एकदा ती मराठी मालिकेत एका नव्या आणि मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मधल्या काळात तिने हिंदी मालिकांमध्ये काम केलं पण बऱ्याच वर्षांनी मराठी मालिकेत ती येतेय. झी मराठीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मधून दीपा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘तू चाल पुढं’ हि मालिका येत्या १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी हि मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेची गोष्ट एका गृहिणीभोवती फिरते. तिने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांबद्दल बोलणार हे कथानक आहे. एकत्र कुटुंबात नांदत असलेल्या अश्विनीला तिच्या नव्या घरासाठी खारीचा वाटा उचलायची फार इच्छा आहे. असेच हे कथानक पुढे विविध रंगानी भरत प्रेक्षकांना आवडेल अशी निर्मात्यांना आशा आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब चौधरी हिच्यासोबतच ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री कडगांवकरदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaachaudhari)

आपल्या नव्याकोऱ्या भूमिकेबद्दल बोलताना दीपा परब चौधरी म्हणाली कि, ‘बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परतल्याची भावना निर्माण झाली आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेचं कथानक अतिशय सुंदर असून ही कथा एक गृहिणी असलेल्या अश्विनी भोवती फिरते… आणि आपल्या कुटुंबासाठी ती काय काय करते..? हे प्रेक्षकांना या मालिकेत पहायला मिळणार आहे. बऱ्याच कालावधी नंतर मराठी मालिका करतेय. त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा भरभरून मिळेल, अशी मी आशा करते. या मालिकेतील अश्विनी हि प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल आणि आपल्यातलीच एक कोणीतरी छोट्या पडद्यावर आपलं नेतृत्व करतेय आणि त्याचसोबत आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतेय हे त्यांना नक्कीच जाणवेल अशी मला खात्री आहे.’

Tags: Ankush ChoudhariDeepaa Parab ChoudhariDhanashri KadgaonkarPromo ReleaseViral VideoZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group