हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या वरून देशभर वातावरण पेटलं असताना आंतरराष्ट्रीय कलाकार रिहानाने शेतकऱ्यांची बाजू घेत भारत सरकारवर टीका केली. पण त्यांना प्रत्युत्तर म्हणून यानंतर बॉलिवूड सेलिब्रेटींनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये बाहेरच्या लोकांनी लक्ष घालू नये तसेच भारतीयांनीही अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. अशा आशयाची ट्वीट केली होती. पण यावर अभिनेत्री तापसी पन्नूनं ‘दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा स्वतःचा विश्वास बळकट करा’ अशा शब्दात बॉलिवूड स्टारनं सुनावलं. आता पुन्हा एकदा तापसी विरुध्द कंगना असा वाद पेटला आहे.
जर एका ट्वीटमुळे देशाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, एखाद्या मस्करीमुळे तुमच्या विश्वासाला तडा जातो, एका शोमुळे तुमच्या धार्मिक भावनांवर परिणाम होतो. तर मग तुम्हाला इतरांचे प्रपोगेंडा टिचर होण्यापेक्षा तुमचा स्वःवर असलेला विश्वास आणखी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. अस तापसी म्हणाली होती.
If one tweet rattles your unity, one joke rattles your faith or one show rattles your religious belief then it’s you who has to work on strengthening your value system not become ‘propaganda teacher’ for others.
— taapsee pannu (@taapsee) February 4, 2021
तापसीच्या या ट्विटला कंगणाने प्रत्युत्तर देत तिचा बी ग्रेड असा उल्लेख केला आहे. कंगनाने लिहिलं की ‘बी ग्रेड लोकांचे बी ग्रेड विचार. आपली मातृभूमी आणि कुटुंबासाठी आपण खंबीरपणे उभं राहायला हवं. हेच कर्म आणि धर्म सुद्धा आहे. फुकट खाणारे होऊ नका. म्हणून या लोकांना मी बी ग्रेड म्हणते. या लोकांकडे लक्ष देऊ नका.’
https://twitter.com/KanganaTeam/status/1357184228165902336?s=20
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post