हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमतोय. एकीकडे राजकीय पदांचा अट्टाहास तर दुसरीकडे विठुरायाच्या दर्शनाची आस. या दोन कारणांमुळे महाराष्ट्राच वातावरण बदलून गेलंय. आता कोणत्या विषयाची चर्चा करावी हा ज्याच्या त्याच्या वैक्तिक विषय. पण चैतन्य आणि समाधान हवे असेल तर वारीहून प्रिय दुसरे ते काय..? जवळपास २ वर्षांनी यंदा वारकऱ्यांची वारी सुरु झाली आहे. पायी निघालेले हे विठुरायाचे भक्त केवळ त्याच्या दर्शनापायी ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता चालत आहेत. भक्ती आणि चैतन्य अनुभवायचे असेल आणि माणसातला देव पाहायचा असेल तर वारी हे एकमेव ते स्थान जिथे देवाचा वाद आहे. यंदाच्या वारीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीदेखील सामावली आहे. यंदा वारीला गेलेली हि अभिनेत्री वारकऱ्यांची सेवा करताना दिसत आहे.
अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. ज्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनही लिहिलं आहे. यात तिने लिहिलंय कि, “पंढरीची वारी, वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजेच पंढरीची वारी होय इथे माणसांमधला देव पाहता येतो. माणुसकी, सेवाभाव, भक्ती आणि अगाध असा अध्यात्माचा महिमा अनुभवता येतो. अशाच एका वारीचा अनुभव”. अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने आपल्या संस्थेबद्दलही माहिती दिली आहे.
या व्हिडीओमध्ये कश्मिरा वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवताना दिसतेय. शिवाय त्यांना जेवण देताना आणि कधी त्यांच्या थकलेल्या पायांना मालिश करून देताना दिसत आहे. विशेष असे कि हे सर्व करताना ती या भक्तीमय वातावरणाशी एकरुप झाली आहे. कश्मिराने २०१९ साली ‘शुचिकृत्य’ या फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या अंतर्गत ती वारीतील वारकऱ्यांना औषधं, अन्न देण्यासोबतच मेडिकल कॅम्प, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देतेय. गेल्या काही वर्षांपासून ती असे विविध उपक्रम राबवतेय.
Discussion about this post