हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे आज पुन्हा एकदा एका पोस्टमूळे चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विधानं करून केतकीने वाद ओढवून घेतल्याचे सर्वश्रुत आहे. दरम्यान केतकीने नुकतीच अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक नवी पोस्ट शेअर केली आहे. आता केतकीची हि पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये केतकीने धर्माविषयी भाष्य केले आहे.
केतकीने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘तुम्ही धावू शकता, तुम्ही लपू शकता, परंतु तुम्ही नशिबापासून सुटू शकत नाही आणि तुम्हाला भौतिक स्वरूपात पाठवलेला उद्देश पूर्ण शिकण्यासाठी पूर्ण करू शकत नाही. तुमचा आत्मा (आत्मा) तुमच्या शरीरात (शव) बंदिस्त आहे. परंतु जो आत्मा आहे ज्याला पाणी पाजले पाहिजे, त्याचं पालनपोषण करायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला हवं आणि आपण आपल्या मागील जीवनात जे शिकले नाही हे जाणून घेण्यासाठी स्वतःच्या आत डोकावणे आवश्यक आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर बिंबलेल्या पाश्चात्य शिकवणींमुळे बहुतेकांचा यावर विश्वास नाही. परंतु आपल्या मुळांकडे परत जा. धर्म नव्हे तर स्वतःचा धर्म शिकायला सुरुवात करा. ओम नमः शिवाय” अशी पोस्ट केतकीने लिहिलीय.
याशिवाय केतकीने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट केली होती ज्यामध्ये तिने लिहिलं होतं की, ‘सनातनी हिंदू मुली फक्त आणि फक्त लव्ह जिहादच्या बळी आहेत की स्टॉकहोम सिंड्रोम हा एक दृष्टीकोन आहे ज्याचा देखील विचार करणे आवश्यक आहे..?’. केतकी चितळेच्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याआधीही अनेकदा केतकी तिच्या अशाच विविध पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
Discussion about this post