हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री केतकी चितळे हि तिच्या अभिनय कारकिर्दीला सोडून सोशल मीडियावरील कारकिर्दीसाठी जास्त चर्चेत असते. आजवर तिने मालिकांमध्ये साकारलेल्या पात्रांपेक्षा जास्त सोशल मीडियावर तिने व्यक्त केलेल्या भूमिका सर्वांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत. आजपर्यंत अनेकदा केतकी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोल झाली आहे, वादात अडकली आहे. आता याचा पुन्हा एकदा तिला फटका बसला आहे. कारण केतकी चितळेचं फेसबुक अकाउंट लॉक झालं आहे तर इंस्टाग्रामने तिची ब्रँडेड कंटेन्ट पात्रता हटवून टाकली आहे. यामुळे तिने इंस्टाग्रामवर संताप व्यक्त केला आहे.
केतकी चितळे अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने नोटिफिकेशनचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. सोबतच तिने घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यात केतकीने लिहिले आहे कि, ‘माझे Facebook अकाउंट लॉक केले गेले आहे आणि Instagram ने माझी ब्रँडेड कंटेन्ट पात्रता काढून टाकली आहे. मेटा पुन्हा पुन्हा रिंग विंग लोकांना कसे बंद करू इच्छित आहे हे सिद्ध करत आहे!
• मी अजूनही ट्विटरवर आहे. हँडल आहे: विकिची
• YouTube वर: epilepsy_warrior_queen आणि एक नवीन चॅनेल “Let’s Talk”
• Spotify, Google, Amazon वर माझे पॉडकास्ट: केल्फीगर्लसोबत जीवन जगणे आणि बहुधा मी लवकरच इतर सोशल मीडियावर येईन किंवा माझी स्वतःची वेबसाइट सुरू करेन जिथे मी खऱ्या गोष्टींचा उलगडा करत राहीन’. अशी पोस्ट केतकीने शेअर केली आहे.
यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘याला म्हणतात वाईट कर्माचे वाईट फळ’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘बरं झालं .. आम्ही सुटलो तरी’. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी केतकीचे समर्थन केले आहे. काहींनी तर केतकीला संबंधित लोकांना कोर्टात ओढण्याचे सल्ले दिले आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी केतकीचे समर्थन करताना म्हटले आहे कि, ‘काही लोकांना सत्य पचवता येत नाही..त्यांना फक्त खोटं आवडतं’. याशिवाय केतकीने पोस्टमध्ये स्वतःच्या वेबसाईटचा उल्लेख केल्यानंतर नेटकऱ्यांनी याबाबत उत्सुकता देखील दर्शवली आहे.
Discussion about this post