हॅलो बॉलिवूस ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या ‘इमली’ या मालिकेतील मालिनी हि नकारात्मक भूमिका साकारताना दिसतेय. ती नेहमीच आपल्या भूमिकांना पूर्ण न्याय देण्यास तत्पर असते. मात्र याही तिच्यासोबत घडलेला प्रसंग तिचे कामाप्रती असणारे प्रेम आणि प्रामाणिकपणा दर्शवितो. मालिकेच्या शूटिंगदरम्यान एक शॉट देत असताना मयुरीच्या साडीच्या पदराला आग लागली पण वेळीच मयुरीचा लक्ष गेला आणि तिने स्वतःला वाचविले. यामूळे वेळीच हा अपघात टळला. अन्यथा अनर्थ निश्चित होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मायुरीच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून मयूरीविषयी काळजी आणि आदर व्यक्त केला आहे. आपला जीव धोक्यात घालून तिने शॉर्ट पूर्ण केला याविषयी सर्वाना विशेष कौतुक आहे.
View this post on Instagram
या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री मयुरी देशमुख शॉट देताना दिसत आहे. मयुरीच्या हातात एक मोठा फोटो आहे. ज्याला आग लावली जात आहे. दरम्यान मयुरी थोडी घाबरलेली दिसते. शॉट चालू असताना आगीचे लोट मयुरीच्या साडीजवळ पोहोचतात आणि तिची साडी पेट घेणार इतक्यात मयुरीचा लक्ष जातो आणि ती स्वतःला वाचवते. मयुरी देशमुखने मोठ्या हिंमतीने स्वतःचा जीव आणि शॉट दोन्हीही वाचवले. कारण तिच्या सावधगिरीमुळे आगीने तिच्या साडीला कुठेही स्पर्श केला नाही. यावेळी खूप मोठा अपघात होता होता वाचला.
हा व्हिडीओ मयुरीने इंस्टाग्रामवर शेअर करताना खेळाडू वृत्तीने एक कॅप्शन दिले आहे कि, प्यार से डर नही लगता साहेब, आग से लगता है. तर तिच्या एका चाहतीने म्हटले आहे कि, भले मालिकेत तुम्हाला नकारात्मक भूमिका दिली असेल पण तुम्ही नेहमीच तुमच्या भूमिकेवर प्रेम केले आहे आणि प्रामाणिकपणे न्याय दिला आहे. अश्या अनेक विविध प्रतिक्रियांमधून मयुरीच्या चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे.
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेली इमली हि मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे आणि त्यातील प्रत्येक पात्राला भरभरून प्रेम मिळत आहे. ही मालिका सुंबूल तौकीरने साकारलेली ‘इमली’ नावाच्या मुलीची कथा असून या मालिकेत मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख मुख्य आणि पहिल्यांदात नकारात्मक भूमिकेत आहे. या मालिकेत मयुरी देशमुख मालिनी नामक भूमिका साकारत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मयुरीचे पती, अभिनेते आशुतोष भाकरे यांनी आत्महत्या केली होती. त्यांचा विवाह २० जानेवारी २०१६ रोजी झाला होता. या घटनेमुळे मयुरी अत्यंत धक्क्यात होती आणि तिने मालिका विश्वापासून अंतर राखले होते.
Discussion about this post