हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या डांन्सने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिच्या डांन्सने चाहत्यांची मने नेहमीच जिंकते. यामुळेच आज नोरालाच्या हातात अनेक चित्रपट आहेत. मात्र, आता नोराने लग्नाबद्दल विचार करण्यास सुरूवात केली आहे. होय, नुकताच नोराने तैमूर अली खानशी (Taimur Ali Khan) लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. करीना कपूर खानच्या चॅट शोमध्ये नोराने तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवली आहे.
करीना कपूरने तिचा चॅट शो ‘वॉट वूमन वॉण्ट’ च्या नवीन भागामध्ये नोरा फतेहीसोबत गप्पा मारल्या आहेत. याच गप्पांदरम्यान नोराने तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. “मला अपेक्षा आहे की जेव्हा तैमूर मोठा होईल तेव्हा मी त्याच्यासोबत एन्गेजमेंट आणि लग्न करण्याचा विचार करु शकते,” असं नोरा म्हणाली. हे ऐकून करीना धक्काच बसला.
नोरा म्हणाली की, तैमुर मोठा झाला की, मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. हे नोराचे बोलणे ऐकून करिना आश्चर्यचकित झाली, करिना म्हणाली की, ठिक आहे पण तैमूर आता फक्त 4 वर्षाचा आहे त्याला लग्न करायला अजून बराच वेळ आहे. त्यावर नोरा हसत म्हणाली की, हरकत नाही तरीपण मी त्याच्यासाठी थांबेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post